शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
2
“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”
3
१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 
4
आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल
5
वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू; जमावाकडून वडील आणि मुलाची निर्घृण हत्या
6
LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब
7
अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...
8
“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल
9
मला वाटते ५ वेळच्या नमाजपेक्षा...; फराह खानने प्रश्न विचारणाऱ्या चाहतीला दिले असे उत्तर...
10
विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी
11
अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ
13
बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!
14
"मी माझ्या आईची हत्या..."; कोलकात्यात तरुणाने आईला चाकूने मारले, मृतदेहासोबत रात्र घालवली; चहा विक्रेत्यासमोर गुन्हा कबूल केला
15
लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'
16
उद्या सुट्टी आहेच, आज रात्री आकाशाकडे डोळे लावून बसा...; चंद्र गुलाबी होणार, ही आहे वेळ...
17
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर गोंधळ घालू लागले; ग्राहक वीज मंडळाचे उंबरे झिजवू लागले
18
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; जप्त केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली
19
नाशकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, अनेकजण जखमी
20
“अल्पावधीत ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले”; उद्धवसेनेच्या नेत्याने यादीच वाचून दाखवली

सिडकोकडून २४ तासांत १२ भूखंड विक्रीच्या निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:31 IST

संभाव्य राजकीय दबाव टाळण्यासाठी सिडकोने ही तातडीची कार्यवाही केल्याचे समजते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ भूधारकांचे भूखंड सिडकोने सोमवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत यापैकी १२ भूखंडांच्या विक्रीसाठी मंगळवारी निविदाही काढल्या. यामध्ये निवासी, निवासी आणि वाणिज्यिक, सामाजिक वापराच्या भूखंडांचा समावेश आहे. संभाव्य राजकीय दबाव टाळण्यासाठी सिडकोने ही तातडीची कार्यवाही केल्याचे समजते. 

सिडकोने भूखंडाचे वाटप केल्यापासून चार वर्षांत बांधकाम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र घेणे नियमाने बंधनकारक आहे. शुल्क अदा करून त्यासाठी मुदतवाढ घेण्याचीही तरतूद आहे. मात्र, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील सोळा भूखंडधारकांनी वेळोवेळी सूचित करूनही अतिरिक्त भाडेशुल्क आणि सेवाशुल्काचा भरणा केला नाही. त्यामुळे सिडकोचे कोट्यवधी रुपये अडकून पडले होते. अभय योजनेलाही भूधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नियमांतील तरतुदीचा आधार घेऊन भूखंडांचे वाटप रद्द करून सोमवारी सिडकोने ते ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले वाशीतील  दोन भूखंड एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयांचे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय दबाव येण्याची शक्यता गृहीत धरून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी भूखंडांची तातडीने विक्री करण्याचे निर्देश विभागाला दिले. 

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबई