शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जप्तीचे संकट टळल्याने सिडकोने सोडला सुटकेचा नि:श्वास; अलिबाग न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

By कमलाकर कांबळे | Updated: February 3, 2024 19:16 IST

अलिबाग न्यायालयाने दिलेल्या जप्ती वॉरंटच्या आदेशाविरोधात सिडकोने मंगळवारी उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे धाव घेतली होती.

नवी मुंबई: वाढीव नुकसानभरपाईपोटी ७२२ कोटी रक्कम वसूल करण्यासाठी अलिबाग न्यायालयाने दिलेल्या जप्ती वॉरंटच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सिडकोवरील मोठे संकट टळले आहे. अलिबाग न्यायालयाने दिलेल्या जप्ती वॉरंटच्या आदेशाविरोधात सिडकोने मंगळवारी उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे धाव घेतली होती. तीवर बुधवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सिडकोला तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.

वाघिवली येथील १५२ एकर भूसंपादनापोटी मुंदडा परिवारास वाढीव  नुकसानभरपाईपोटी मंजूर केलेली ७२२ कोटींची रक्कम सिडकोने न दिल्याने अलिबाग न्यायालयाने सिडकोविरोधात जप्ती वॉरंट बजावले होते. हे जप्ती वॉरंट बजावण्यासाठी मुंदडा परिवारातील सदस्यांसह त्यांचे वकील व कोर्टाचे बेलिफ सिडकोत पोहोचले. या जफ्ती वॉरंटमध्ये सिडकोतील व्यवस्थापकीय व सहव्यवस्थापकीय संचालकांच्या वाहनांसह त्यांच्या कार्यालयातील ५००० खुर्च्या, २५०० टेबल, २००० पंखे, १००० कपाटे, ५०० एसी, १००० संगणक आणि सिडकोच्या मालकीची इतर वाहने आणि साहित्य जप्त करण्याचे नमूद केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने अलिबाग न्यायालयाच्या जप्ती आदेशाला स्थगिती दिल्याने जप्ती वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी आलेल्या मुंदडा परिवार, बेलिफ व वकिलांना माघारी फिरावे लागले. दिलीप ढोले यांची शिष्टाई सिडकोच्या पथ्यावरअलिबाग न्यायालयाने जप्ती वॉरंटला मंजुरी दिल्याची बाब लक्षात येताच सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांनी आपल्या विधी विभागाला तातडीने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सिडकोच्या संबंधित विभागाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारी रोजी याप्रकरणी तातडीची सुनावणी ठेवली. दरम्यान, उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी सिडकोवर जप्तीची कारवाई करण्याचे हेतूने जप्ती वॉरंट घेऊन न्यायालयाचा बेलिफ, मुंदडा परिवाराचे वकील व काही सदस्य सिडकोत दाखल झाले. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांनी संबंधितांना शांत राहण्यास सांगून उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत जप्तीची कारवाई करण्यास मज्जाव केला. तसेच तब्बल दोन-अडीच तास जप्तीची कारवाई करण्यापासून त्यांना रोखून धरले. याच कालावधीत उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्याने कारवाईसाठी आलेल्या पथकाला माघारी फिरावे लागले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCourtन्यायालय