शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

२०० भूखंडांसाठी सिडकोने पारसिक डोंगर पोखरला! सपाटीकरण त्वरित थांबवा, पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 10:43 IST

Navi Mumbai: नवी मुंबई शहराचा लौकिक असलेल्या बेलापूर येथील पारसिक डोंगराच्या सपाटीकरणाचा धडाका  सिडकोने पुन्हा एकदा सुरू आहे. विकासाच्या नावाखाली २०० भूखंडासाठी त्याची कापणी केली जात आहे.

नवी मुंबई : शहराचा लौकिक असलेल्या बेलापूर येथील पारसिक डोंगराच्या सपाटीकरणाचा धडाका  सिडकोने पुन्हा एकदा सुरू आहे. विकासाच्या नावाखाली २०० भूखंडासाठी त्याची कापणी केली जात आहे. त्यासाठी हजारो वृक्षांचा बळी घेतला जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असून पावसाळ्यात भूस्ख्खलन  होऊन दरडी कोसळण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. डोंगर पोखरण्चा हा प्रकार त्वरित थांबवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह मुख्यमंत्र्याकडे केली आहे. पारसिक डोंगरावर मोठ्याप्रमाणात बांधकामे केली जात आहेत. सिडकोने या ठिकाणी अनेक भूखंड रेखांकित करून त्याची विक्री सुरू केली आहे. त्यासाठी डोंगराचा बळी घेतला जात असून जेसीबी लाऊन त्याची कापणी केली जात आहे. यासंदर्भात नाट कनेक्ट फाउंडेशन या संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे मुख्य वनसंवर्धक एस.व्ही रामाराव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

संपूर्ण वाढलेल्या झाडांचा बळी?हिलवर अंदाजे २०० भूखंड चिन्हांकीत केले आहेत. त्यापैकी जवळपास शंभर भूखंडांचे वाटप पूर्ण झाले. उर्वरित भूखंडांसाठी टेकडीचे सपाटीकरण केले जात आहे. त्यासाठी संपूर्ण वाढलेल्या झाडांचा बळी घेतला जात असल्याचा आरोप हरितप्रेमींनी केला आहे. मात्र, व्यापारी सिडकोने पर्यावरणाचा ऱ्हास करून आपले डोंगर पोखरण्याचे काम सुरूच ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे वनविभागाचे दुर्लक्षविशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या टेकडीच्या कापणीसंदर्भात मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण कारवाईसाठी वन विभागाकडे सुपुर्द केले होते. त्यानंतर काही दिवस पारसिक डोंगर कापण्याचे काम थांबले होते. परंतु, आता त्याच्या पूर्वेकडील बाजूला पुन्हा जेसीबी लावून सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे नाट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.रविवारपासून पारसिकच्या रहिवासी बाजूला नवीन स्थळावर कापणी सुरू केली आहे. येथील रहिवासी  विष्णू जोशी यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करून पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती असल्याने ही कापणी थांबविण्याची विनंती महापालिकेकडे केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको