शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात सिडको बांधणार पाच हजार घरे; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 11:59 IST

जानेवारी महिन्यात सिडकोच्या सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : जानेवारी महिन्यात सिडकोच्या सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. ही घरे घणसाेली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या नोडमध्ये असणार आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. यापूर्वीची घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी होती. मात्र, नवीन वर्षात घोषणा होणारी पाच हजार घरे सर्वसामान्य घटकांसाठी असणार आहेत. विशेष म्हणजे मध्यम व उच्च आर्थिक गटातील ग्राहकांना या योजनेद्वारे घराचे स्वप्न पूर्ण करता येईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने गेल्या तीन वर्षांत २४ हजार घरे बांधली आहेत. त्यातील पात्र ग्राहकांना सध्या घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या नवीन गृहयोजनेची ग्राहकांना प्रतीक्षा होती. दिवाळीच्या मुहूर्तावर गृहयोजना जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे हा मुहूर्त टळला, असे असले तरी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता नवीन गृहयोजनेबाबत घोषणा केली आहे. सिडकोने गृहनिर्मितीवर अधिक भर दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील चार वर्षांत ८७ हजार घरे बांधण्याचे सिडकोचे उद्दिष्ट्य आहे. नवी मुंबईच्या विविध २७ ठिकाणी या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने २०२५ पर्यंत या घरांचा ताबा देण्याची सिडकोची योजना आहे.   कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांसाठी सिडकोने अलीकडेच विशेष गृहयोजना जाहीर केली होती. त्यातील यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना २०२२ पर्यंत घरांचा ताबा दिला जाणार आहे.नवी मुंबईच्या विविध भागांत घरे बांधली जाणार आहे. खासगी विकासकांपेक्षा ही घरे स्वस्त असणार आहेत. काही ठिकाणी घरांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारणे, सोडत आणि ताबा या प्रक्रिया गतिमान करण्यावर सिडकोचा भर असणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcidcoसिडको