शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

चिरनेरमधील खून व्यावसायिक वादातून

By admin | Updated: June 24, 2017 01:02 IST

चिरनेरमध्ये अर्शद सैफी या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्यावसायिक स्पर्धेमधून मित्रानेच त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चिरनेरमध्ये अर्शद सैफी या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्यावसायिक स्पर्धेमधून मित्रानेच त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोपाल रामसिंग राजपूत, सूरज राजन हिंदुराज नायर, राजासिंग अग्निदेवसिंग चौहान यांचा समावेश आले. मयत अर्शद सैफी व आरोपी गोपाल राजपूत हे दोघेही उलवे येथे बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या कंपनीमध्ये एकत्रितपणे सुपरवायझर म्हणून नोकरी करत होते. नोकरी करताना संपर्क वाढल्याने अर्शद याने एप्रिल २०१६ मध्ये नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्याच्या प्रगतीमुळे गोपाळ याच्या मनामध्ये ईर्षा निर्माण झाली होती. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्यही होते. यामुळे अर्शदपासून गोपाळ याला स्वत:च्या जीवास धोका वाटू लागला होता. यामुळे त्याने त्याचे दुसरे दोन सहकारी सूरज नायर व राजासिंग चौहान यांच्या मदतीने त्याचा खून करण्याचा कट रचला होता. तिघांनी अर्शदला दारू पाजून स्कॉर्पिओ गाडीतून चिरनेरमध्ये नेले व गळा आवळून खून केला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडाने विद्रूप केला. ३१ मे रोजी ही घटना घडली होती. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसाडीकर व युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. बबन जगताप, किरण भोसले, सुभाष पुजारी यांच्या पथकाने तपास करून २२ दिवसांमध्ये तीनही आरोपींना अटक केली आहे.