शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये नाताळनिमित्ताने चर्च सजले; सलग सुट्ट्यामुळे सायन-पनवेल मार्गही चक्काजाम

By वैभव गायकर | Updated: December 23, 2023 16:35 IST

‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल दि वे’च्या सुरांमध्ये  शहरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पनवेल: ख्रिश्चन बांधवांचा सर्वांत मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पनवेल शहरातील चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली असून सकाळी सामूहिक प्रार्थना तर संध्याकाळी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल दि वे’च्या सुरांमध्ये  शहरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव सकाळी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. त्यानंतर सर्वत्र केक आणि ख्र्रिसमस ट्रीसह ठिकठिकाणी सांताक्लॉज अवतरतात. ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात. नाताळचा उत्सास सर्वधर्मीयांमध्ये पाहायला मिळतो.दि.25 रोजी सोमवारी नाताळ सर्वत्र साजरा होणार आहे.याकरिता पूर्वतयारी पहावयास मिळत असून पनवेल शहरासह खारघर,कळंबोली,नवीन पनवेल मधील चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

चर्चबाहेर असलेले चांदण्या, मेणबत्त्या, येशू ख्र्रिस्तांच्या जन्माचा देखावा, आदी तयारी पूर्ण झाली आहे.चर्चसह विविध खाजगी कार्यालये, घरामध्ये रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, ख्रिसमस ट्री तसेच येशूच्या जन्मस्थळाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या उत्सवासाठी शहरात ठिकठिकाणी संगीताच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. पनवेलमधील विविध बाजारपेठा मध्ये नाताळ निमित्ताने विविध वस्तु ,सँटा कॅप,ट्री आदी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.विशेष म्हणजे नवी मुंबई मधील विविध सिग्नलवर देखील क्रिसमसच्या निमित्ताने विविध वस्तुची विक्री विक्रेते करताना दिसून येत आहे.

सलग सुट्ट्यामुळे सायन पनवेल हायवे चक्काजाम शनिवार,रविवार तसेच पुढे सोमवारी नाताळच्या सुट्ट्यामुळे नागरिक पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात शनिवारी घराबाहेर पडल्याने वाहनांची मोठी गर्दी सायन पनवेल महामार्गावर पहावयास मिळाली.खारघर,कळंबोली पुढे पळस्पे फाटा याठिकाणी वाहनांच्या रांगा पहावयास मिळाल्या.

शनिवार सकाळ पासूनच खारघर जवळ वाहनांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.सलग सुट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी बंदोबस्तावर होते.-संतोष काणे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक , खारघर वाहतुक शाखा )

टॅग्स :panvelपनवेलhighwayमहामार्ग