शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

सोशल मीडियामुळे सापडला चिमुरडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:10 PM

घरचा पत्ता न सापडल्यामुळे एक चिमुरडा घणसोली गावातील गुणाले तलावाजवळ रडत होता.

नवी मुंबई : घरचा पत्ता न सापडल्यामुळे एक चिमुरडा घणसोली गावातील गुणाले तलावाजवळ रडत होता. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून एका युवकाने त्याची विचारपूस केली आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर तब्बल सात तासांनी पालकांच्या ताब्यात मुलाला सुखरूप सुपूर्द करण्यात आले. माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना गुरुवारी घणसोलीत घडली.शिवम कुमार (५), असे सापडलेल्या मुलाचे नाव आहे. घणसोलीतील शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत पाटील सकाळी गुणाले तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असताना एक मुलगा तेथे रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या वेळी त्याची चौकशी केली असता त्याला घरचा पत्ता सांगता येत नव्हता. पाटील मुलाला घरी घेऊन आले. त्याला खाऊ दिले. अनेक तास उलटूनही मुलाचे पालक सापडत नसल्यामुळे रबाळे पोलीस ठाण्यात पाटील यांनी संपर्कही साधला. त्यानंतरही पालक सापडेना, दुपारी १ वाजताच्या सुमारास त्याला दुचाकीवरून घणसोली, नोसिल नाका आणि झोपडपट्टी परिसरात फिरवून आणले. तरीही यश मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि काही तासांतच मुलाचे पालक मुलाला घेण्यासाठी पाटील यांच्याकडे आले.