शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 08:28 IST

अंश राजभर (१३) असे मुलाचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १ येथे आई, मोठ्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. महापालिकेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.

नवी मुंबई :  विजेचा शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू झाला. रबाळे एमआयडीसीमधील मॅचव्हील सिंडिकेट कंपनीत हा प्रकार घडला आहे. आई व मोठ्या बहिणीला आधार देण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.अंश राजभर (१३) असे मुलाचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १ येथे आई, मोठ्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. महापालिकेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. वडील कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर आई व मोठ्या बहिणीच्या सुखासाठी तो झटत होता. अशात नुकताच तो रबाळे एमआयडीसीमधील मॅचव्हील सिंडिकेट या कंपनीत ठेकेदारामार्फत कामाला लागला होता. शुक्रवारी सकाळी तो रात्रपाळी संपवून घरी जायची तयारी करीत असतानाच विजेचा शॉक लागला. या वेळी त्याला वाशीतील पालिका रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे त्याच्या आई व बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र तो बालकामगार असतानाही कागदोपत्री वय वाढवून त्याला नोकरीला ठेवण्यात आले होते. त्यामुळे ठेकेदारासह कंपनीपुढे कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात राजभर कुटुंबाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर कुटुंब ठाम राहिल्याने त्यांचा प्रयत्न फसला.

अर्थकारणासाठी परिवाराची दिशाभूलअंशच्या अपघाती मृत्यूला संधी समजून एका राजकीय व्यक्तीने अर्थकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. कंपनी विरोधातली तक्रार टाळण्यासाठी कुटुंबाला चार लाखांचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाला. शिवाय रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतली घटना असतानाही, कोपर खैरणे पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावर कुटुंब ठाम राहिल्याने त्याचा प्रयत्न फसला.

nराजभर कुटुंबाने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करूनदेखील एका अधिकाऱ्याकडून चालढकल सुरू होती. या अधिकाऱ्याने मृतदेहाच्या शवविच्छेदनादरम्यान शनिवारी वाशीतील रुग्णालयातदेखील जाऊन प्रत्यक्षदर्शीसोबत अरेरावीची भाषा वापरत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर संबंधितांनी वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांना संपूर्ण घटनेबाबत कळवले. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी गीते यांनी परिवाराची भेट घेऊन त्यांना कारवाईचे आश्वासन दिले. 

टॅग्स :AccidentअपघातelectricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई