शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:42 IST

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.

नवी मुंबई: घणसोलीमधून प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याला ठाणे खाडीत सोडण्याच्या संदर्भात पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये जलद गतीने विकास होणा-या घणसोली येथील प्रति दिन ३७ दशलक्ष लीटर (एमएलडी) क्षमतेचा मलनि:स्सारण प्रकल्प बंद पडण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हा प्रकल्प उभारण्यात आलेला भूखंड विवादात अडकला आहे. लोकमतने याबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. 

यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट ठाणे खाडीत सोडले जात असल्याने तिथल्या जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. मलनि:स्सारण प्रकल्प वारंवार बंद पडत आहे. तो संपूर्ण क्षमतेवर कार्यरत नसल्यामुळे बहुतांश सांडपाणी खाडीत प्रवाहित होत असल्याची स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे.

या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेतील (मनपा) स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार घणसोली गावाचे रहिवासी कान्हा पाटील यांनी घणसोलीतील सेक्टर १५ मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या भूखंडावर उभारलेल्या या प्रकल्पावर हरकत घेतली आहे. त्यांच्या आरोपानुसार सिडकोने या भूखंडाचा ताबा घेतलेला नाही.

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देत, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शहर विकास विभाग-१चे प्रमुख सचिव असीम गुप्ता यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. शहर विकास विभाग-१मध्ये सिडको आणि नवी मुंबई मनपा दोघांचा आंतर्भाव होतो.नवी मुंबई मनपाने प्रकल्प उघडण्यासाठी पोलिसांची देखील मदत घेतली होती, परंतु आता एक आठवड्यापेक्षा जास्त काळापासून हा प्रकल्प बंद आहे.नवी मुंबई मनपा सिडकोच्या समन्वयाने या समस्येचे समाधान काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. प्रक्रिया न केलेले पाणी खाडीत सोडण्यावर तीव्र चिंता व्यक्त करताना नॅटकनेक्टने सांगितले की यामुळे खाडीतले मासे आणि खेकडेच नाही तर संपूर्ण जलचर विविधता धोक्यात आली आहे. यामुळे जैवविविधता आणि खाडीतले मासे व खेकडे खाणा-या लोकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होणार आहे, असे कुमार म्हणाले. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा टाक्यांमध्ये केले जाणारे संग्रहण सुध्दा लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे कुमार यांनी सांगितले.

या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याची आणि लोकहितासाठी नवी मुंबई मनपाला आपले काम यथायोग्य पध्दतीने करु देण्याची नॅटकनेक्टने सिडकोला विनंती केली आहे. “२१व्या शतकातील शहरामध्ये अशाप्रकारची समस्या कायम स्वरुपी असता कामा नये” असे ते म्हणाले.

वनशक्ती एनजीओच्या सागरशक्ती या समुद्री शाखेचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले की, प्रक्रिया न केलेले सांडपाणी खाडीतील प्राणी व वनस्पतींसाठी विनाशक आहे. खरेतर मुंबईमध्ये सुध्दा ब-याच ठिकाणी खाडीत सांडपाणी थेट प्रवाहित केले जाते. परंतु अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदे