घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 11:41 AM2023-10-26T11:41:47+5:302023-10-26T11:42:09+5:30

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.

Chief Minister's intervention in solid waste disposal center closure case; City Development Department directed to probe on Natconnect's complaint | घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश 

घणसोली मलनि:स्सारण केंद्र बंद प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; नॅटकनेक्टच्या तक्रारीवरुन शहर विकास विभागाला चौकशीचे निर्देश 

नवी मुंबई: घणसोलीमधून प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याला ठाणे खाडीत सोडण्याच्या संदर्भात पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये जलद गतीने विकास होणा-या घणसोली येथील प्रति दिन ३७ दशलक्ष लीटर (एमएलडी) क्षमतेचा मलनि:स्सारण प्रकल्प बंद पडण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हा प्रकल्प उभारण्यात आलेला भूखंड विवादात अडकला आहे. लोकमतने याबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. 

यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट ठाणे खाडीत सोडले जात असल्याने तिथल्या जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. मलनि:स्सारण प्रकल्प वारंवार बंद पडत आहे. तो संपूर्ण क्षमतेवर कार्यरत नसल्यामुळे बहुतांश सांडपाणी खाडीत प्रवाहित होत असल्याची स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे.

या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेतील (मनपा) स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार घणसोली गावाचे रहिवासी कान्हा पाटील यांनी घणसोलीतील सेक्टर १५ मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या भूखंडावर उभारलेल्या या प्रकल्पावर हरकत घेतली आहे. त्यांच्या आरोपानुसार सिडकोने या भूखंडाचा ताबा घेतलेला नाही.

पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत, पाटील यांनी मलनि:स्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.
नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देत, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शहर विकास विभाग-१चे प्रमुख सचिव असीम गुप्ता यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. शहर विकास विभाग-१मध्ये सिडको आणि नवी मुंबई मनपा दोघांचा आंतर्भाव होतो.
नवी मुंबई मनपाने प्रकल्प उघडण्यासाठी पोलिसांची देखील मदत घेतली होती, परंतु आता एक आठवड्यापेक्षा जास्त काळापासून हा प्रकल्प बंद आहे.
नवी मुंबई मनपा सिडकोच्या समन्वयाने या समस्येचे समाधान काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.
 
प्रक्रिया न केलेले पाणी खाडीत सोडण्यावर तीव्र चिंता व्यक्त करताना नॅटकनेक्टने सांगितले की यामुळे खाडीतले मासे आणि खेकडेच नाही तर संपूर्ण जलचर विविधता धोक्यात आली आहे. यामुळे जैवविविधता आणि खाडीतले मासे व खेकडे खाणा-या लोकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होणार आहे, असे कुमार म्हणाले. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा टाक्यांमध्ये केले जाणारे संग्रहण सुध्दा लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे कुमार यांनी सांगितले.

या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याची आणि लोकहितासाठी नवी मुंबई मनपाला आपले काम यथायोग्य पध्दतीने करु देण्याची नॅटकनेक्टने सिडकोला विनंती केली आहे. “२१व्या शतकातील शहरामध्ये अशाप्रकारची समस्या कायम स्वरुपी असता कामा नये” असे ते म्हणाले.

वनशक्ती एनजीओच्या सागरशक्ती या समुद्री शाखेचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले की, प्रक्रिया न केलेले सांडपाणी खाडीतील प्राणी व वनस्पतींसाठी विनाशक आहे. खरेतर मुंबईमध्ये सुध्दा ब-याच ठिकाणी खाडीत सांडपाणी थेट प्रवाहित केले जाते. परंतु अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Chief Minister's intervention in solid waste disposal center closure case; City Development Department directed to probe on Natconnect's complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.