शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती उदयनराजे सुद्धा तुमच्या मिशीला घाबरतात: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:24 IST

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट (कांदा- बटाटा मार्केट) येथे स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 86वी जयंती व  माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता

नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट (कांदा- बटाटा मार्केट) येथे स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 86वी जयंती व  माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मोळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मिशीला साताऱ्याचे उदयनराजे भोसले देखील घाबरत असल्याचे वक्तव्य या मेळ्याव्यात केले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यातील भाषणात म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारने स्व. अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली व्हायली आहे. येत्या काळात माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी  नरेंद्र पाटील यांनी मी यापुढे राहील नाही राहील असं वक्तव्य केले होते. मात्र आता कामगारांच्या चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाली, पण चळवळीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही या मंचावर असाल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना बोलून दाखविला. त्याचप्रमाणे उदयनराजेंनी मला सांगितले होते की मला दोन व्यक्तीच्या मिशीची भीती वाटते त्यामध्ये नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे छत्रपतींनीचं असं सांगितल्याने तुम्हाला काळजी करायची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना सांगितले.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून युती होणारच, असे ठणकावून सांगितले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर जयवंत सुतार, सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक व विविध मान्यवरांची उपस्थिती होते.  दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सानपाडा पामबीच येथील सेक्टर - 17मध्ये वडार समाज राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या पुढाकाराने उभारलेल्या राज्यातील पहिल्या  वडार भवनाला सदिच्छा भेट दिली.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस