शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरच्या टोळक्याची नेरूळमध्ये हाणामारी; दोघांना अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 5, 2024 17:40 IST

आईचे पैसे चोरल्याचा संशयातून घेणार होते जीव 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नेरुळ येथे एका तरुणावर चार जणांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी पार्किंग कर्मचारी व इतरांच्या मदतीने जखमीचे प्राण वाचले होते तर हल्ला करणाऱ्या एकाला पकडले होते. हे सर्वजण चेंबूरचे असून केवळ हल्ल्याच्या उद्देशाने एकाचा पाठलाग करत रेल्वेने नेरूळला आले होते. 

नेरुळ स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये शनिवारी रात्री हि घटना घडली. त्याठिकाणी एका तरुणावर काहीजण कोयता, दांडके व दगडाने हल्ला करत होते. यामध्ये जखमी तरुण बचावासाठी धावत एका वाहनाखाली घुसला असताना देखील हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते. हा प्रकार पाहून तिथल्या पे अँड पार्किंगमध्ये काम करणाऱ्या मुकीम उस्मानी याने आरडा ओरडा करत सदर तरुणाच्या बचावासाठी धाव घेतली. त्याचवेळी इतरही नागरिक धावून आले असता हल्लेखोर पळू लागले. यामुळे मुकीम याने पळणाऱ्या एकाच्या दिशेने बांबू फेकून त्याला पाडून पकडून ठेवले. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करून पकडलेल्या हल्लेखोराला ताब्यात घेतले होते. 

अधिक चौकशीत जखमीचे नाव हर्ष खरे (२०) असून तो व हल्ला करणारे चेंबूरचे असल्याचे समोर आले. हर्ष याने आपल्या आईचे पैसे चोरून तिची छेड काढल्याचा साहिल परघरमोर (२२) याचा आरोप आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील आहे. मात्र या प्रकरणात साहिल हा हर्षचा कायमचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो संधीच्या शोधात असताना शनिवारी रात्री हर्ष हा पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वेत चढताना दिसला. याचवेळी साहिल देखील त्याच्या साथीदारांसह बॅगेत कोयता घेऊन त्याच रेल्वेतुन त्याच्या पाठोपाठ आला होता. नेरुळ स्थानकात हर्ष उतरून स्थानकाबाहेर निघताच साहिल व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे थोडक्यात हर्षचे प्राण वाचले. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असता एक अल्पवयीन असल्याचे समोर आले. उर्वरित साहिल व इतर एकाला अटक केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. 

रेल्वेतून आणली हत्यारे. 

हर्षच्या मागावर आलेल्या साहिल व साथीदारांनी बॅगेत हत्यारांसह रेल्वेतून प्रवास करत नेरुळ गाठले. यापूर्वी पण सीबीडी येथे मुलांच्या दोन टोळ्यात झालेल्या हाणामारीत मानखुर्द परिसरातील मुलांनी हत्यारांसह रेल्वेने सीबीडी गाठले होते. यावरून रेल्वे प्रवास्यांचा प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी