ज्वारीची भाकर ‘गोड’; १० ते २० रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका 

By नामदेव मोरे | Published: April 16, 2024 05:44 AM2024-04-16T05:44:41+5:302024-04-16T05:44:51+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्वारी ३५ ते ७५ रुपये किलो दराने विकली जात होती.

Cheaper by Rs 10 to 20 Consumers will get relief, but farmers will suffer | ज्वारीची भाकर ‘गोड’; १० ते २० रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका 

ज्वारीची भाकर ‘गोड’; १० ते २० रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका 

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई
: राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये ज्वारीची आवक वाढू लागली असून दर घसरू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्वारी ३५ ते ७५ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर २५ ते ५६ रुपयांवर आले आहेत. तीन महिन्यात १० ते २० रुपयांची घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

ज्वारीची भाकरी हे गरिबांचे अन्न समजले जात होते. परंतु, आरोग्यासाठी भाकरी लाभदायक असल्याने मुंबई, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्येही भाकरीला पसंती मिळू लागली आहे. यामुळे गव्हापेक्षा ज्वारीला जास्त दर मिळत आहे. गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढले होते. २०२४ च्या सुरुवातीला होलसेल मार्केटमध्ये ज्वारीला  ३५ ते ७५ रुपये किलो एवढा दर मिळाला. किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ६५ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात होती.  

राज्यातील ज्वारीचे दर
बाजार समिती    प्रतिकिलो दर

सोलापूर    ३३ ते ३५
धुळे    २० ते ३८
जळगाव    २७ ते ३४
सांगली    ३१ ते ३४
नागपूर    ३५ ते ३८
अमरावती    २५ ते २८
पुणे    ३८ ते ५०
बीड    १६ ते ३९
जालना    २० ते ३५
छ.संभाजीनगर    १८ ते ३५
अमळनेर    २० ते २३

सोमवारी २२० टन ज्वारीची आवक  
फेब्रुवारीपासून ज्वारीचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये २२० टन ज्वारीची आवक झाली आहे. सोलापूर परिसरातून ज्वारी विक्रीसाठी येत आहे. होलसेल मार्केटमध्ये २५ ते ५६ रुपये किलो भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ४० ते ६० रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे. ज्वारीचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असली तरी सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. 

Web Title: Cheaper by Rs 10 to 20 Consumers will get relief, but farmers will suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.