शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
3
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
4
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
5
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
8
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
9
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
10
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
11
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
12
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
13
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
14
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
15
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
16
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
17
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
18
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
19
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
20
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जप्ती टाळण्यासाठी बदलला वाहनाचा नंबर; एकाच नंबरप्लेटचे दोन ट्रेलर 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 16, 2022 18:52 IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार झाला उघड

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एकाच नंबरप्लेटचे दोन ट्रेलवर रस्त्यावर धावत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सापळा रचला असता एकाच नंबरचे दोन ट्रेलर आढळून आले. अधिक चौकशीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने ट्रेलरवर बँकेचे कर्ज असून त्याचे हप्ते थकल्याने संभाव्य जप्ती टाळण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली.

तुर्भे एमआयडीसी मधील एस. एस. लॉजिस्टिक व शिवम ट्रान्सपोर्ट यांच्या माल वाहतुकीसाठी एकाच नंबरचे दोन ट्रेलर वापरले जात असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर यांनी बुधवारी पहाटे तुर्भे नाका येथे पथकासह सापळा रचला होता. यावेळी दोन ट्रेलर एकच क्रमांकाची नंबरप्लेट वापरलेले दोन ट्रेलर आढळून आले. त्यामुळे दोन्ही ट्रेलर जप्त करून कागदपत्रांची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये बँकेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यानुसार गुरुवारी रात्री ट्रेलर चालक हरिचंद्र यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु दोन वाहनांना एकच नंबरप्लेट वापरण्याचा हा प्रकार ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शिवम सिंग यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांनी केल्याची कबुली दिली आहे. एका ट्रेलरवर बँकेचे कर्ज असून ते थकलेले आहे. यामुळे बँकेकडून येणारी जप्ती टाळण्यासाठी बँकेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला असून त्याची कल्पना सर्वांना होती. परंतु ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने केलेल्या कृत्यात केवळ चालकावर गुन्हा दाखल झाल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर या प्रकरणात आरटीओ कडून कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे कि नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बँकेची दिशाभूल करण्यासाठी केलेल्या कृत्यात त्या ट्रेलर कडून अपघात झाला असता तर तपासात पोलिसांना देखील अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे याप्रकरणी संबंधित सर्वांवर कारवाईची मागणी होत आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी