शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आभासी चलनाच्या गुंतवणुकीत फसवणूक, वाशीत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:59 IST

आभासी चलनात गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात नेरुळच्या व्यक्तीने ४ लाख १६ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली आहे.

नवी मुंबई : आभासी चलनात गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात नेरुळच्या व्यक्तीने ४ लाख १६ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेची परतफेड न करता बाजारमूल्य नसलेले चलन देवून संबंधितांनी त्यांची फसवणूक केली आहे.पोलिसांनी सुमारे दीड वर्षापूर्वी नेरुळ येथील आभासी चलनाच्या प्रचारासाठी भरलेल्या सेमिनारवर कारवाई केल्यानंतरही शहरात असे सेमिनार सुरूच आहेत. नागरिकांना आभासी चलनात गुंतवणूक केल्यास जास्त नफा असल्याचे भासवून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जात आहे. त्याकरिता बिटकॉईनसह अनेक विदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी देशभर सक्रिय आहेत. त्यांच्याकडून जागोजागी सेमिनार घेवून झटपट श्रीमंतीची दिवास्वप्ने दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले जात आहे. मात्र अशाच आमिषाला बळी पडलेल्या नेरुळच्या ज्ञानेश्वर गऊल यांची ४ लाख १६ हजारांची फसवणूक झाली आहे. त्यांनी खरेदी केलेल्या बिटकॉईनची संबंधितांनी परस्पर विक्री केली. यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता त्यांना एमकॅप नावाचे बाजारमूल्य नसलेले चलन देवून फसवण्यात आले. याप्रकरणी गाऊल यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्ही. आर. रामुगडे अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारे इतरही अनेकांच्या फसवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक झालेल्यांनी गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :crimeगुन्हे