शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 21:40 IST

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

पनवेल :खारघर मध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एम टी विभागात डीआयजी पदावर असलेले निशिकांत मोरे यांच्यावर गुरुवारी  पोस्को अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्यासंदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.   

सदर व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी  तळोजा आणि खारघर  पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही तक्रार दाखल करून घेत जात नसल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी खारघर मध्ये पत्रकार परिषद घेतली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निवेदन देणार  असल्याचे मुलीच्या वडिलांनी  परिषदेत सांगितले होते.

तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले विकसक पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी  खारघर मध्ये ओळख झाली. त्यामुळे एकमेकांच्या घरी ये जा करीत असे,मोरे यांनी त्यांच्याकडून  दुकान गाळे विकत घेतले. काही पैसे रोख देवून दुकान गाळ्याचा ताबा घेवून उर्वरित पैसे देवू असे सांगितले. दुकान गाळ्याचे पैसे देत नसल्याने विकासकांनी आगष्ट महिन्यात नवी मुंबई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली.

दरम्यान, जून महिन्यात सतरा वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतांनाही मोरे घरी आले आणि केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचे निदर्शनास आले. मोरे यांच्या विरोधात तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रार दाखल करून घेतले नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता.अखेर याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात  सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी