शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पामबीचवर कारचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:35 IST

गुन्हा दाखल : कारमधील दोन नंबर प्लेटचे गूढ कायम

नवी मुंबई : पामबीच मार्गावर वेगवान कारच्या अपघाताची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कारमधील तरुण बचावले असून, अपघातानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या दरम्यान कारला लावलेली नंबरप्लेट व आतमधील एका नंबरप्लेटवर भिन्न नंबर असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आले.

पामबीच मार्गावर आगरी कोळी भवन येथील जंक्शच्या ठिकाणी हा अपघात घडला. बेलापूरकडून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या कार (एम.एच. ४६ बीएफ १९५०)च्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे पलटी झालेली कार रस्त्याच्या दुभाजकावरील झाडे व विजेच्या खांबाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये कार पूर्णपणे चेपली गेली. मात्र, सुदैवाने एअर बॅगमुळे कारमधील तरुण थोडक्यात बचावले.

सुदैवाने ही कार विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन इतर वाहनांना धडकली नाही. अन्यथा, मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती. या अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने ते कारच्या बाहेर आले असता, त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी कारमध्ये डोकावून पाहिले असता, दोन नंबरप्लेटवर भिन्न नंबर आढळून आले. गाडीला लावलेल्या नंबरप्लेटवर व कारमध्ये पडलेल्या नंबर प्लेटवर पूर्णपणे भिन्न नंबर होते; परंतु पोलिसांनी या प्रकाराला दुजोरा दिलेला नाही. मात्र, वेगाने कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर नेरुळ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात