शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण करून कोरोनाची लढाई जिंकू शकत नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:15 IST

कोरोनाच्या संकटकाळात उलवे नोडमधील आरोग्यसेवेची पोकळी भरून काढण्याचे काम केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटकाळात उलवे नोडमधील आरोग्यसेवेची पोकळी भरून काढण्याचे काम केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोटे दाखवायची. माहिती नसताना राजकीय विधाने करायची. राजकारण करून कोरोनाची लढाई आपण लढू शकत नाही. तुमची लढाई कोविडशी असली पाहिजे. भाजपशी नाही, पंतप्रधान मोदींशी नाही. मोदी तर तुम्हाला सोबत घेऊन कोविडशी लढाई लढताहेत. मात्र, तुम्हाला यात राजकारण करायचेय. हे कृपया बंद करा. आज ज्या प्रकारे केंद्र सरकार मदत करतेय. त्यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा या संकटात उभा राहतोय, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (२) उलवे येथील ६० बेडच्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी केले.

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात उभारण्यात आलेल्या ६० बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या संकटकाळात उलवे नोडमधील आरोग्यसेवेची पोकळी भरून काढण्याचे काम केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, बीव्हीजी समुहाचे हणमंतराव गायकवाड, साई देवस्थानचे विश्वस्त रवी पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस