ठाणो : मुंब्रा-शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या महापालिका अधिकारी आणि बिल्डर अशा 15 जणांचे जामीन रद्द करण्यासाठी ठाणो पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या दुर्घटनेचा निकाल तातडीने लावण्यासाठी विशेष न्यायालयाची निर्मिती करावी, अशी मागणीही केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
अल्प कालावधीत मुंब्रा-शीळफाटा परिसरातील लकी कम्पाउंडमध्ये आदर्श ए आणि बी या दोन इमारती उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी बी इमारत 4 एप्रिल 2क्13 रोजी कोसळली. या दुर्घटनेत 74 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले होते. याप्रकरणी मिळालेल्या नोंदवहीवरून पोलिसांनी 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करून आतार्पयत 25 जणांना अटक केली. त्यामध्ये इमारतीच्या मुख्य बिल्डरांसह त्यांचे भागीदार, महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. अटक के लेल्या आरोपींपैकी 19 जण सध्या जामिनावर आहेत. तत्कालीन महापालिका उपायुक्त दीपक चव्हाण यांच्यासह स्थानिक नगरसेवक हिरा पाटील आदींची ठाणो आणि मुंबई न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. त्यापैकी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेल्या 15 जणांचे जामीन रद्द करण्यासाठी ठाणो पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने महापालिका अधिकारी आणि बिल्डरांचा समावेश असल्याचे सूत्रंनी सांगितले.
शीळफाटा दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यातील आरोपींना जामीन न मिळता ते कोठडीत असणो अपेक्षित होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली. त्याच निर्णयाविरोधात 15जणांचे जामीन रद्द होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.