शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अनधिकृत होर्डिंग बॅनरविरोधात मोहीम सुरूच; ऐरोलीत २९८ ठिकाणी कारवाई 

By नामदेव मोरे | Updated: April 1, 2024 19:05 IST

आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग, पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.

नवी मुंबई: ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग, बॅनर, कटआऊट, वॉलपोस्टर्सवर नियमित कारवाई सुरू केली आहे. पाच दिवसांमध्ये २९८ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या ‘सी व्हिजील ॲप’वर आलेल्या तक्रारींचीही तत्काळ दखल घेतली जात आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग, पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. परंतु यानंतरही अनेक ठिकाणी भिंतीवर कोरलेला मजकूर, खासगी इमारतीवरील होर्डिंग, कटआऊट, बॅनर्स, झेंडा व भित्तीपत्रके पाहावयास मिळतात. ऐरोली विधानसभा क्षेत्रामधील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे व तुर्भे विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नियमित कारवाई केली जात आहे. यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. १७ ते २२ मार्च दरम्यान या परिसरामध्ये २९८ होर्डिंग बॅनर हटविण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांना तक्रारी करणे सहज शक्य व्हावे यासाठी निवडणूक विभागाने सी व्हिजील ॲप उपलब्ध करून दिला आहे. या ॲपवर नागरिकांना फोटोसह तक्रार करता येते. ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये या तक्रारींचीही तत्काळ दखल घेतली जात आहे. आतापर्यंत सी व्हिजील ॲपवर १५ तक्रारी आल्या असून त्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

शहरातील अनधिकृत होर्डिंग व बॅनरविरोधात ऐरोली मतदारसंघात नियमित कारवाई केली जात आहे. याशिवाय निवडणूक विभागाच्या सी व्हिजील ॲपवर आलेल्या तक्रारींचीही तत्काळ दखल घेतली जात आहे. - डॉ. कैलास गायकवाड, नियंत्रक आचारसंहिता पथक, ऐरोली विधानसभा सी व्हिजील ॲपचा नागरिकांना पर्यायशहरात कुठेही होर्डिंग, बॅनर, कटआऊट, भित्तीपत्रके आढळल्यास नागरिक निवडणूक विभागाच्या सी व्हिजील ॲपवर फोटोसह तक्रारी करू शकता. या ॲपवर आलेल्या तक्रारीची पुढील १०० मिनिटांत दखल घेऊन उचित कार्यवाही केली जाते. भरारी पथकाची नियुक्तीऐरोली मतदार संघासाठी १२ भरारी पथके तयार केली आहेत. एक पथकामध्ये ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २४ तास हे पथक कार्यरत असते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई