शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

नवी मुंबईत घर घेणे आता पडणार महागात; सिडकोने भूखंडांच्या मूळ दरात केली १५ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 06:19 IST

कोरोनामुळे दोन वर्ष आपल्या भूखंडाच्या मूळ दरात कोणतीही वाढ न करणाऱ्या सिडको महामंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी भूखंडाच्या मूळ किमतीत १५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

नवी मुंबई :

कोरोनामुळे दोन वर्ष आपल्या भूखंडाच्या मूळ दरात कोणतीही वाढ न करणाऱ्या सिडको महामंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी भूखंडाच्या मूळ किमतीत १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानुसार वाशी नोडमध्ये प्रति चौरस मीटरसाठी २२,४९० रुपये दर असणार आहे. नवी मुंबईतील हा सर्वाधिक दर आहे. बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केल्यानंतर आता सिडकोने भूखंडांच्या दरात तब्बल १५ टक्के वाढ केल्याने नवी  मुंबईत घर घेणे आता आणखी महागणार आहे.

कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बांधकाम उद्योगाला बसला आहे. त्यामुळे बांधकाम उद्योगाला भरारी देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अनेक योजना जाहीर केल्या आहेत. भूखंड विक्री हाच महसुलाचा मुख्य स्रोत असलेल्या सिडकोची या काळात पंचाईत झाली. कारण सिडकोच्या माध्यमातून आपल्या भूखंडांच्या मूळ दरात १० ते १५ टक्के वाढ केली जाते. मात्र,  रिअल इस्टेट क्षेत्रातील पडझड लक्षात घेऊन तसेच सर्वसामान्य ग्राहकांना भूखंडांत गुंतवणूक करता यावी, यादृष्टीने सिडकोने कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात आपल्या भूखंडाचे मूळ दर स्थिर ठेवले.  सिडकोच्या भूखंडाच्या मूळ किमतीवरून खासगी प्रकल्पातील घरांचे दर निश्चित होतात. 

दोन वर्षे सिडकोने जमिनीच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ न केल्याने नवी मुंबईतील घरांच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. मात्र, मागील काळात रिअल इस्टेट क्षेत्रात काहीसे तेजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने चालू आर्थिक वर्षासाठी जमिनीच्या मूळ किमतीत १५ टक्के वाढ केली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठी असणार आहे. दरम्यान, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांचे स्वप्न भंग पावणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

नोडनिहाय निश्चित केलेले जागेचे दर (प्रति चौरस मीटर)ऐरोली         १३,२२०घणसोली     ११,४६०कोपरखैरणे     १५,३९०वाशी     २२,४९०सानपाडा     १८,७८०नेरूळ     १९,३१५सीबीडी बेलापूर     १३,५४५खारघर     १३,५४५नवीन पनवेल     १२,५१०कळंबोली     ९,५३०कामोठे     ९,५३०द्राेणागिरी     ९,८५०उलवे     ८,७४५

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई