शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

‘त्या’ चौदा गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको! गणेश नाईक यांची भूमिका 

By कमलाकर कांबळे | Updated: September 1, 2024 21:18 IST

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कमलाकर कांबळे,  लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. या गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. खर्चाचा हा भार नवी मुंबई महापालिकेवर नको, अशी भूमिका आमदार नाईक यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यास आपला विरोध कधीच नव्हता आणि आजही नाही, परंतु त्यामुळे नवी मुंबईकरांवर अन्याय होणार असेल, तर गप्प बसणार नाही. कारण, या गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पायाभूत सुविधांचा बोजवरा उडाला आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभारली आहेत. नवी मुंबईत ही गावे समाविष्ट केल्यास महापालिकेवर आर्थिक भार पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीए किंवा सिडकोच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा. नवी मुंबईकरांच्या कररूपी पैसा येथील पायाभूत सुविधांवर खर्च होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनाही भूमिका कळविली आहे.

- गावांच्या समावेशासाठी तीन अटी

भौगोलिकदृष्ट्या या चौदा गावांचा नवी मुंबईशी फारसा संबध नाही. असे असतानाही या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याअगोदर पारसिक डोंगरातून एक बोगदा काढून चौदा गावांना जोडणारा रस्ता तयार करावा. चौदा गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ७,००० कोटींचा खर्च लागणार आहे. याचा खर्च एमएमआरडीए, सिडको किंवा इतर प्राधिकरणाला करण्यास सांगावे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना आमदार नाईक यांनी केली आहे.

त्या चौदा गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पुढील काही काळात येथील लोकसंख्या वीस लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. मागील पाच वर्षांत अनियंत्रित व अनियोजित खर्चामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. अशा परिस्थितीत ही चौदा गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करून नवी मुंबईकरांवर अन्याय होऊ देणार नाही. - गणेश नाईक, आमदार, भाजप.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका