कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेल्या सुनील जोशीसह अन्य चार जणांचे निलंबन कायद्यानुसार संपुष्टात आल्याने त्यांचा केडीएमसीच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातल्या आदेशावर सोमवारी आयुक्त रामनाथ सोनवणो यांची स्वाक्षरी झाल्यामुळे मंगळवारपासून ते सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अभियंता आणि सहायक संचालक नगररचनाकार जोशी यांना 22 फेब्रुवारी 2क्1क् रोजी 5 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना रुजू करून घेण्यासंदर्भात महासभेत दाखल करण्यात आलेला अशासकीय प्रस्ताव वादग्रस्त ठरला होता. सत्ताधारी शिवसेनेवर हा प्रस्ताव माघारी घेण्याची नामुश्की आली होती.
दरम्यान, नियमानुसार दोन वर्षे निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यावर निलंबित अधिका:यांना पुन्हा कामावर घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, जोशीसह अन्य निलंबित अधिका:यांनी केडीएमसी प्रशासनाकडे रुजू करून घेण्याची विनंती केली होती. यावर ऑगस्ट 2क्14मध्ये पार पडलेल्या निलंबन आढावा समितीच्या बैठकीत जोशीसह सुहास गुप्ते आणि अन्य अधिकारी, कर्मचा:यांच्या निलंबनावर चर्चा झाली होती. त्यानुसार जोशी, गुप्ते यांच्यासह अन्य तिघांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. जोशीचा सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी न्यायालयाचा निकाल लागेर्पयत त्यांना सेवेत घेऊ नये, असा ठराव महासभेत संमत करण्यात आला आहे. त्यामुळे जोशीला सेवेत रुजू करून घेण्याच्या आयुक्त रामनाथ सोनावणो यांच्या निर्णयावर आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
च्निलंबित अधिकारी अथवा कर्मचारी यांचा निलंबनाचा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, संबंधितांना कामावर घेण्यात आले आहे, असे केडीएमसी आयुक्त रामनाथ सोनवणो यांनी सांगितले.