शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हातोड्याचे घाव घालत प्रियकर-प्रेयसीने कॅबचालकाला संपवले; धक्कादायक घटनेचा असा झाला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:12 IST

हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेले असता तेथे झालेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : उलवे येथे एका कॅबचालकावर हातोड्याने हल्ला करत डोळे फोडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रेयसीसह प्रियकरावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेले असता तेथे झालेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला.

मोहगावात राहणाऱ्या संजय पांडे (वय ४४) यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तीन दिवसांनी त्यांच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. डोक्यावर हातोडीचे घाव घालून, तसेच डोळे फोडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता. ही हत्या २ एप्रिलला झाल्याची शक्यता आहे. रिया सरकन्यासिंग (वय १९) व तिचा प्रियकर विशाल शिंदे (२१) यांनी ही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

रिया, विशाल हे दोघे पांडेच्या कॅबमधून नियमित पुण्याला जात असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. मात्र, घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तिथे  विशाल आला. 

ब्लॅकमेल केल्याचा आरोपपांडे आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियाने केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची हत्या केली. हत्येनंतर त्याचीच कार व मोबाइल घेऊन दोघेही पुण्याला गेले. मात्र, तिथे अपघात झाल्याने संबंधित वाहनचालक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाताना त्याला चकवा देऊन ते नाशिकला पळाले.

त्यांनी दिली खुनाची कबुली शनिवारी रात्री नाशिकमध्येही अपघात झाल्यानंतर ते दोघे पोलिसांच्या हाती लागले. कारमालकाबद्दल केलेल्या चौकशीत त्यांनी पांडेच्या हत्येची  कबुली दिली. नाशिक पोलिसांनी याबाबत कळविले असता पांडेच्या घरझडतीमध्ये मृतदेह मिळाल्याचे सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहूल यांनी सांगितले.

कार चालविता येत नसल्याने अपघात पांडेची कार घेऊन दोघे पळून गेले असता त्यांना कार चालविता येत नसल्याने त्यांच्याकडून पुण्यात अपघात झाला.  यावेळी समोरील वाहनधारक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. मात्र, त्यांना चकवा देऊन ते नाशिकला पळाले.  तिथेही त्यांच्याकडून अपघात झाला असता ते पोलिसांच्या हाती लागले. गाडी पांडेच्या नावावर असल्याचे चौकशीत समोर आले असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर उलवे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी