शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस संघटनेच्या दोघांना अटक; कारवाईच्या धाकावर उकळली जायची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:20 IST

केंद्र सरकारची संघटना असल्याचे भासवुन खंडणी उकळणारया दोघांना गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली आहे. एकांद्या बनावट अर्जाद्वारे व्यवसायीकांना कारवाईची धमकी देवून त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : केंद्र सरकारची संघटना असल्याचे भासवुन खंडणी उकळणारया दोघांना गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली आहे. एकांद्या बनावट अर्जाद्वारे व्यवसायीकांना कारवाईची धमकी देवून त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे. याची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे. तर संघटनेचा उल्लेख असलेली त्यांची कार देखिल पोलीसांनी जप्त केली आहे.केंद्र अथवा राज्य सरकारची संघटना असल्याचे भासवणारया बोगस संघटना शहरात वाढल्या आहेत. त्यामध्ये मानवाधिकार, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, ह्युमर राईट्स अशा संघटनांचा समावेश आहे. सामाजिक संघटना म्हणुन धर्मादाय आयुक्त कार्यालयात अशा संघटनांची नोंद होत आहे. यानंतर ती संघटना थेट केंद्र अथवा राज्याशी संबंधीत असून पदाधीकारी व सदस्य निवडले जातात. याकरिता संघटनेच्या पदाचे फायदे सांगून इच्छुकांकडून लाखो रुपये घेतले जातात. शिवाय मदतीच्या बहाण्याने घडत असलेल्या गैर प्रकारांच्या तक्रारी मागवल्या जातात. अशी एखांदी तक्रार प्राप्त झाल्यास ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्यांना कारवाईचा धाक दाखवुन पैसे उकळले जातात. शहरात मोठ्या प्रमाणात अशा बोगस संघटनांचा सुळसुळाट सुटला असल्याचे वृत्त २४ जानेवारीला लोकमतने प्रसिध्द केले होते. अशा बोगस संघटनांमुळे शासनाची बदनामी व सर्वसामान्यांची फसवणुक होत असल्याने संबंधीतांवर कारवाईची गरज व्यक्त केली होती. याची दखल घेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी देखिल बोगस संघटनांवर कारवाईच्या सुचना पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीसांकडून अशा बोगस संघटनांच्या पदाधिकारयांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. यादरम्यान पनवेलमधील क्राईम इंटेलीजन्स फोर्स नावाच्या संघटनेबद्दल गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी यांना मिळाली होती. त्यानुसार युनिट दोन मार्फत सुरु असलेल्या तपासादरम्यान दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची एक कार (एमएच ४६ एपी ९४७२) देखिल जप्त करण्यात आली आहे. या कारवर संघटनेचा ठळक अक्षरात उल्लेख करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान त्यांनी अनेकांना धमकावुन लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. तर काही नागरीकांनी या संघटनेला भुलून त्यांच्याकडे केलेल्या तक्रारींचे अर्ज देखिल पोलीसांच्या हाती लागले आहेत. यामुळे या संघटनेसह अशा इतर बोगस संघटनांचे पदाधीकारी पोलीसांच्या रडारवर आले आहेत. अटक केलेल्या दोघांचे लागेबंधू दिल्लीतील काही व्यक्तींपर्यंत देखिल असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शहरात उघडपने अद्यापही अशा अनेक बोगस संघटनांच्या पदाचा उल्लेख असलेल्या अलिशान कार दिसत असतानाही, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा