शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भवनचे मे महिन्यात भूमिपूजन, अजित पवार यांची घोषणा

By योगेश पिंगळे | Updated: March 1, 2024 19:22 IST

आमदार म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महाराष्ट्र भवनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले.

नवी मुंबई : वाशी येथील आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे, यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, मे महिन्यात महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या अंतिम अर्थसंकल्पातील चर्चेवरील उत्तरात विधानभवन येथे केली.             नवी मुंबई शहरात अनेक राज्यांची भवन आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र भवनदेखील उभारण्यात यावे, यासाठी आमदार म्हात्रे आग्रही असून, त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. सिडकोतर्फे यासंदर्भातला जो काय आराखडा आहे तो पूर्ण करण्यात येईल आणि मे महिन्यात कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. 

आमदार म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महाराष्ट्र भवनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNavi Mumbaiनवी मुंबई