शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशी टोलवर चोख बंदोबस्त

By admin | Updated: January 31, 2017 03:46 IST

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवार, ३१ जानेवारीला नवी मुंबईमध्येही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाशी व कामोठे टोलनाक्यावर महामार्ग

नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवार, ३१ जानेवारीला नवी मुंबईमध्येही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाशी व कामोठे टोलनाक्यावर महामार्ग अडविण्याचा इशारा देण्यात आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणा देत राज्यभर मूक मोर्चे काढल्यानंतरही शासनाने अद्याप समाजाच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज नवी मुंबईच्यावतीनेही वाशी व कामोठे टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी शहरभर बैठका घेवून व सोशल मीडियामधून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी कोकण भवनमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये ५ लाखपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. चक्का जाम आंदोलनासही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्यात यावे असे संदेश रात्री उशिरापर्यंत पोहचविले जात आहेत. सायन - पनवेल महामार्गावर हे आंदोलन होणार असल्याचे पोलीस यंत्रणेवरही ताण आला आहे. कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबईमधील मराठा समाजाचे नागरिक व माथाडी कामगार सकाळी ९ वाजता माथाडी भवनसमोर एकत्र येणार आहेत. येथे आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह मराठा समाजाचे विविध पदाधिकारी चर्चा करून आंदोलन कुठे करायचे हे निश्चित करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)दोन हजार पोलीस तैनात मंगळवारी होणाऱ्या चक्का जाम मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. पोलीस ठाण्याचे व वाहतूक विभागाचे सुमारे दोन हजार पोलीस बंदोबस्तावर कार्यरत राहणार असून त्यांची साप्ताहिक सुटी रद्द करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चक्का जाम केला जाऊ शकेल अशी दोन ठिकाणे पोलिसांना अपेक्षित आहेत. त्यामध्ये वाशी टोल नाका व कळंबोली हायवे या ठिकाणांचा समावेश असून, अशा संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता दंगल निवारण पथक, वरुण व वज्र, स्ट्रायकिंग फोर्स हे देखील सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त तुषार दोषी यांनी दिली. तर यापूर्वीचे मराठा मोर्चे शांततेत झालेले असल्यामुळे मंगळवारी होणारा मोर्चा देखील कायद्याच्या चौकटीत राहून होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.