शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:31 IST

बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

नवी मुंबई -  बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या वेळी महापौर जयवंत सुतार यांनीही बेस्टच्या कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.जुईनगर येथील गणेश मंदिर सभागृहात रविवारी बेस्ट कामगारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने ही बैठक घेण्यात आली. या वेळी समितीचे प्रमुख कामगारनेते शशांक राव, उदय भट, अरविंद कागीनकर, विजय कुलकर्णी यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले, तर नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांनीही या बैठकीला उपस्थित राहून बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. तसेच परिवहन ही महापालिकेचीच जबाबदारी असून, नवी मुंबईप्रमाणे मुंबई महापालिकेनेही ती स्वीकारावी, असा सल्लाही त्यांनी दिला.राव यांनी बेस्टच्या कामगारांची आर-पारच्या लढ्याची वेळ आल्याचे सांगितले; परंतु कामगारांचे प्रश्न सुटण्याऐवजी ते सरकार दरबारी लाल फितीच्या कारभारात अडकून पडत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. यामुळे जर शासनाने बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर सहकुटुंब मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना घेरू, असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे. या बैठकीला शहरातले रहिवासी असलेले बेस्टचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BESTबेस्टEmployeeकर्मचारीnewsबातम्या