शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

बडोदा बँक प्रकरण : पुराव्याअभावी हाजीदची १९ गुन्ह्यांतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:51 AM

बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या हाजीद मिर्जा बेग १९ गुन्ह्यांत पुराव्याअभावी निर्दोष सुटलेला आहे. गुन्हा करते वेळी मागे कसलाही पुरावे राहणार नाहीत, याची खबरदारी तो घेत असतो.

सूर्यकांत वाघमारे / लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या हाजीद मिर्जा बेग १९ गुन्ह्यांत पुराव्याअभावी निर्दोष सुटलेला आहे. गुन्हा करते वेळी मागे कसलाही पुरावे राहणार नाहीत, याची खबरदारी तो घेत असतो. त्यानुसार बडोदा बँक लुटतानाही त्याने बाळगलेल्या खबरदारीमुळे त्याच्यावरील गुन्हा सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण होण्याची शक्यता आहे.जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. हाजीद अली सब्दर अली मिर्जा बेग उर्फ साजीद उर्फ लंगड्या (४५) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर राज्यात व राज्याबाहेर ८० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १९ गुन्ह्यांत त्याची निर्दोष मुक्तता झाली असून, उर्वरित गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. हाजीद हा सराईत गुन्हेगार असून, गेली अनेक वर्षांपासून तो घरफोडीची टोळी चालवत आहे. या टोळीत त्याच्या इतर चार साथीदारांचा समावेश असून, त्यांनी मुंबईसह, गुजरात व पुणे याठिकाणी सर्वाधिक घरफोड्या केल्या आहेत. त्याला अनेकदा अटक होऊनही त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त होऊ शकलेला नाही. शिवाय त्याच्याविरोधात सबळ पुरावे जमवण्यातही पोलीस कमी पडल्याने १९ गुन्ह्यांत त्याची निर्दोष सुटका झालेली आहे. त्यामुळे अटक केलेल्या टोळीविरोधातले सबळ पुरावे जमवण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.एखादा गुन्हा घडल्यास गुन्हेगाराच्या शोधासाठी पोलिसांना मोबाइलचा तपास महत्त्वाचा ठरत असतो. पूर्वानुभवानुसार याची जाणीव हाजीदला असल्याने तो पकडले जाऊ नये याकरिता मोबाइलचा वापर टाळायचा. आजवर केलेल्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्याने वॉकीटॉकी वापरल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे, तर साथीदारांना देखील तो घटनास्थळावर मोबाइल वापरू देत नव्हता. त्याशिवाय गुन्ह्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्यास त्यामध्ये आपण दिसणार नाही याचीही खबरदारी टोळीकडून घेतली जायची; परंतु बडोदा बँक लुटून पळून जाण्यासाठी त्यांनी जो मार्ग वापरला त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. भुयार खोदण्यासाठी वापरलेला भाड्याचा गाळादेखील फडक्याने पुसून वास्तव्याचे पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न त्यांनी केल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे. यानंतरही हाजीद व त्याच्या टोळीवर तो सिद्ध करण्यासाठी अधिकाधिक पुरावे जमवून न्यायालयापुढे त्यांना दोषी ठरवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.हाजीद अली मिर्जा बेग ऊर्फ साजीद याने मागील काही वर्षांपासून स्वत:चा मोबाइल फोन वापरलेला नाही. ठरावीक काळासाठी एखादा चोरीचा मोबाइल वापरून तो फेकून द्यायचा, तर साथीदारांसोबत संपर्क साधण्यासाठीही मोबाइलऐवजी पब्लिक टेलिफोन वापरायचा; परंतु तांत्रिक तपासात एक पाऊल पुढे असलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या पथकापासून त्याची चलाखी टिकली नाही.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस