शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा पावणार, सार्वजनिक गणेश मंडळांना अनामत रकमेसह भाडे होणार माफ

By नारायण जाधव | Updated: August 25, 2023 15:21 IST

या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप भाडे माफ करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनामत रकमेसह मंडप भाडे माफ करावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या यांच्याकडे आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप भाडे माफ करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका क्षेत्रात विविध सार्वजनिक मंडळे कार्यरत असून, या मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सवाबरोबरच अनेक लोकोपयोगी असे उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळे त्या-त्या विभागातील गोरगरीब व गरजू नागरिकांना त्याचा फायदा होतो.

महापालिकेच्या विविध उपक्रमांत ते सक्रिय सहभागी होतात; परंतु मागील दोन वर्षांत विविध कारणांमुळे या मंडळांची आर्थिक स्थिती नाजूक झाली असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा, यासाठी अनामत रक्कम आणि मंडप भाडे माफ करण्याची मागणी आमदार म्हात्रे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा हवाला त्यांनी आपला पत्रात दिला आहे.यासंदर्भात आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक दिला असून लवकरच ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही अनामत रक्कम आणि मंडप भाडे माफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्या म्हणाल्या.