शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे की दि.बा. पाटील?; आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 23:45 IST

आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लक्ष

वैभव गायकरपनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीचे पडसाद नवी मुंबईमध्ये उमटले आहेत.स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते हे अनेक वर्षांपासून विमानतळाला दि.बा. यांचे नाव देण्याची मागणी करीत आले आहेत. मात्र प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या दि.बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दि.बा. पाटील यांनीच स्थापन केलेल्या प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची धुरा मध्यंतरी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर या समितीत फूट पडली. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सध्या सल्लागार म्हणून काम पाहणारे बबन पाटील यांना या समितीचे अध्यक्षपदी नेमले. रामशेठ ठाकूर भाजपचे नेते असल्याने महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना दूर सारले. 

सध्या शिवसेनेचे निष्ठावंत व बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बबन पाटील हे या समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. मध्यंतरी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात गावबैठका घेऊन प्रकल्पग्रस्तांमध्ये जनजागृती करण्याचे चांगले काम या समितीमार्फत करण्यात आले. मात्र नुकत्याच निर्माण झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत संघर्ष समितीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने यापूर्वी वेळोवेळी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन सरकारकडे केली आहे. मात्र या समितीमार्फत नव्याने निर्माण झालेल्या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दि.बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन पाटील यांना याबाबत विचारणा केली असता; नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत दोन दिवसात बैठक घेणार आहोत. या बैठकीत सर्व सदस्यांशी चर्चा केल्यावर समितीची भूमिका स्पष्ट केली जाईल असे सांगितले.

अध्यक्षांची कोंडी 

स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन पाटील यांची ओळख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र म्हणून आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सेनेत कार्यरत आहेत.  मात्र स्वतः स्थानिक प्रकल्पग्रस्त असल्याने प्रकल्पग्रस्तांची दि.बा. पाटील यांच्या नावाला पसंती लक्षात घेता विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून पाटील यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.समितीमार्फत नव्याने निर्माण झालेल्या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

टॅग्स :AirportविमानतळUddhav Thackerayउद्धव ठाकरेNavi Mumbaiनवी मुंबई