शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारले, डॉ. डोंगरगावकर यांचा आकडेवारीसह दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:12 IST

लोकसभा निवडणुकीत राज्यातील आंबेडकरी जनतेसह बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारल्याचा दावा आंबेडकरी विचाराचे नेते डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केला आहे.

पनवेल : लोकसभा निवडणुकीत राज्यातील आंबेडकरी जनतेसह बहुजनांनी वंचित आघाडीला नाकारल्याचा दावा आंबेडकरी विचाराचे नेते डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केला आहे. वंचित आघाडीच्या आवाहनाकडे पाठ दाखवत बहुजनांसह मागासवर्गीय मतदारांनी शिवसेना आणि भाजप युतीला मतदान करणे हिताचे मानल्याचे डॉ. डोंगरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी हा दावा केला आहे.राज्यात एकूण पाच कोटी ३६ हजार २२० मतदारांनी मतदान केले आहे. राज्यात अनुसूचित जाती, जमाती आणि मुस्लीम समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. हे लक्षात घेता त्यांची एकत्रित एक कोटी ७० लाख ६७ हजार ५९० इतकी मते बहुजन वंचित आघाडी, तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात बहुजन वंचित आघाडीला ३६ लाखांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, मुस्लीम सर्वच आघाडीवर मतदारांनी बहुजन वंचित आघाडीला नाकारल्याचे चित्र राज्यात पाहावयास मिळत असल्याचे डोंगरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे निवास असलेल्या पुण्यातही बहुजन वंचित आघाडीला आपला फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे मागील तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत; परंतु त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा फायदा समाजाला झालेला नाही. कारण या दोन्ही नेत्यांचे राजकारण बेरजेकडे जाण्याऐवजी वजाबाकीच्या दिशेने सुरू असल्याची टीका डोंगरगावकर यांनी केली आहे. बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस सोबत आघाडी केली असती, तर चार ते पाच जागा सहज पदरात पाडून घेता आल्या असत्या. तसेच त्यामुळे काँग्रेसच्या जागाही वाढल्या असत्या; परंतु चुकीच्या धोरणामुळे रिपब्लिकनच्या राजकीय चळवळीची मोठी हानी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर