शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शहरवासीयांचे स्वप्न साकार, चित्रफितीमधून उलगडणार बाबासाहेबांचा जीवनपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 03:22 IST

ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर ७ वर्षांनंतर पूर्ण होणार आहे.

नवी मुंबई : ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर ७ वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच जयंती उत्सव स्मारकामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या वेळी भीमगीतांसह बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफीत व चवदार तळ्यावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. ५ एप्रिल २०१३मध्ये काम पूर्ण करून आंबेडकर जयंतीला स्मारकाचे लोकार्पण करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु विविध कारणांनी स्मारकाचे काम रखडले.जयंती जवळ आली की उद्घाटनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या जाऊ लागल्या. काम सुरू होऊन सात वषे झाल्यानंतरही अद्याप पूर्ण काम होऊ शकलेले नाही. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आले. यामुळे यावर्षी जयंती उत्सव स्मारकामध्ये करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता जयंती उत्सव होणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित परशुराम कोळी निर्मित भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने जीवनपटावर आधारित चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. महाड येथील चवदार तळ्यावरील सत्याग्रह या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थुल तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, बुलढाणा येथील प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे उपस्थित राहणार आहेत.महापौर जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कायक्रमप्रसंगी महापालिका पदाधिकारी, उपस्थित राहणार आहेत. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया ५५ लाभार्थी विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये रकमेची विशेष शिष्यवृत्ती वितरीत केली जाणार आहे. नवी मंबईमधील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.>लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर ७ वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच जयंती उत्सव स्मारकामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या वेळी भीमगीतांसह बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफीत व चवदार तळ्यावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. ५ एप्रिल २०१३मध्ये काम पूर्ण करून आंबेडकर जयंतीला स्मारकाचे लोकार्पण करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु विविध कारणांनी स्मारकाचे काम रखडले.जयंती जवळ आली की उद्घाटनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या जाऊ लागल्या. काम सुरू होऊन सात वषे झाल्यानंतरही अद्याप पूर्ण काम होऊ शकलेले नाही. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आले. यामुळे यावर्षी जयंती उत्सव स्मारकामध्ये करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता जयंती उत्सव होणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित परशुराम कोळी निर्मित भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने जीवनपटावर आधारित चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. महाड येथील चवदार तळ्यावरील सत्याग्रह या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थुल तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, बुलढाणा येथील प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे उपस्थित राहणार आहेत.महापौर जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या कायक्रमप्रसंगी महापालिका पदाधिकारी, उपस्थित राहणार आहेत. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया ५५ लाभार्थी विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये रकमेची विशेष शिष्यवृत्ती वितरीत केली जाणार आहे. नवी मंबईमधील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.>आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टीभूखंडाचे क्षेत्रफळ५७५० चौरस मीटरबांधकाम क्षेत्रफळ२३१० चौरस मीटरमुख्य हॉल - ३०० चौ.मीटरकॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मीटरसर्विस एरिया - १७२ चौ.मीटरव्हीआयपी रूम व कार्यालय- ६४ चौ.मीटरपोडियम गार्डन - ८२५ चौ.मीटरखुले सभागृह - ८५६ चौ.मीटरप्रार्थना हॉल - ३२५ चौ.मीटरवस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मीटरकलादालन - १३४ चौ.मीटरकॅफेटेरिया - ११४ चौ.मीटरवाचनालय - ११४ चौ.मीटरवॉटर बॉडी - २७५ चौ.मीटरडोम - ४९ मीटर उंच