शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

क्षेत्रसभा गठित करण्यास मनपाची टाळाटाळ

By admin | Updated: July 9, 2017 02:16 IST

प्रभागाच्या विकासामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यासाठी क्षेत्रसभा गठित करणे बंधनकारक आहे. प्रत्येक प्रभागात वर्षातून किमान दोन सभा होणे

- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : प्रभागाच्या विकासामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यासाठी क्षेत्रसभा गठित करणे बंधनकारक आहे. प्रत्येक प्रभागात वर्षातून किमान दोन सभा होणे आवश्यक आहे; परंतु महापालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप क्षेत्रसभा गठित करण्यात आलेल्या नाहीत. नगरसेवकांसह प्रशासनाला कामकाजामध्ये लोकसहभाग नको असल्यानेच क्षेत्रसभेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. निवडणुका आल्या की, सर्वपक्षीय उमेदवार मतदारांचे मन वळविण्यासाठी घरोघरी हेलपाटे घालत असतात; परंतु एकदा निवडणुका झाल्या की, सर्वांनाच नागरिकांचा विसर पडत असतो. प्रभागाच्या व शहराच्या विकासामध्ये लोकांना थेट सहभागी होता यावे, यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायदा १९४९मध्ये २००९मध्ये दुरुस्ती केली. कलम प्रमाणे महापालिकेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये किंवा विभागामध्ये क्षेत्रसभा गठित करणे आवश्यक आहे. यामध्ये नगरसेवक, अधिकारी व नागरिकांचा सहभाग असणार आहे. किमान सहा महिन्यांतून एक सभा आयोजित करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. नागरिकांनी प्रभागाच्या विकासासाठी अत्यावश्यक कामे सुचविणे अपेक्षित आहे. रस्ते दुरुस्ती, पदपथ, पथदिवे, मलनि:सारण वाहिनी, सार्वजनिक स्वच्छता व इतर कामे सुचविणे आवश्यक आहे. नागरिकांनी सुचविलेल्या कामांची नोंद घेऊन त्यांची अंमलबजावणी प्रशासनाने करणे आवश्यक आहे. सभेमध्ये सुचविल्यापैकी कोणती कामे केली व इतर सर्व गोष्टींची माहिती नागरिकांना देणे आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांची कर्तव्ये काय आहेत याविषयी जनजागृती करणेही आवश्यक आहे. या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर नगरसेवकांवर कारवाई करण्याचीही तरतूद आहे; परंतु याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सामाजिक कार्यकर्ते मंगेश भास्कर म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून क्षेत्रसभेविषयी काय कार्यवाही केली आहे, याविषयी माहिती विचारली होती. मे २०१५ ते मे २०१७पर्यंत नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोठे क्षेत्रसभा घेण्यात आली? किती क्षेत्रसभा घेण्यात आल्या आहेत? याचा तपशील त्यांनी मागितला होता. पालिका प्रशासनाने अद्याप क्षेत्रसभा गठितच करण्यात आल्या नसल्याने एकही सभा झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रत्येक प्रभागात वर्षातून दोन वेळा क्षेत्रसभा घेणे बंधनकारक असताना, पालिका प्रशासनाने व नगरसेवकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे, कायद्यावर बोट ठेवून चालणारे तुकाराम मुंढे आयुक्त असतानाही त्यांनी क्षेत्रसभा घेण्याविषयी काहीही केलेले नव्हते. आॅक्टोबर २०१५मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी १५ दिवसांमध्ये क्षेत्रसभा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अद्याप अंमलबजावणी झालेली नसून नागरिकांचा सहभाग नको असल्यानेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. क्षेत्रे निर्धारित करणेमहापालिका कायदा कलम ‘२९-ब’प्रमाणे प्रत्येक निवडणूक प्रभागाची ज्या क्षेत्रामध्ये विभागणी करण्यात येईल, अशी क्षेत्रे निर्धारित करणे. प्रत्येक क्षेत्राच्या प्रादेशिक सीमा निर्धारित करील की, ज्यामध्ये मतदान केंद्राच्या मतदार यादीमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यक्ती या सर्वसाधारण रहिवासी असतील किंवा शासनाने ठरविल्यास दोन किंवा अधिक मतदान केंद्रांच्या संपूर्ण भौगोलिक प्रदेशाचा यामध्ये समावेश असेल.क्षेत्रसभेच्या बैठकीविषयी तरतूदक्षेत्रसभेचे कार्याध्यक्ष हे सभा बोलावतील. सचिव हे दिनांक, वेळ व ठिकाण ठरवून त्याविषयी प्रभागामध्ये जनजागृती करतील, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. सहा महिन्यांतून किमान एक सभा घेणे बंधनकारक आहे.क्षेत्रसभेची कार्य व कर्तव्येविभागात राबवायच्या योजना व विकास कार्यक्रम यांचा प्राधान्यक्रम सुचविणे आणि अशा योजना व कार्यक्रम प्रभाग समितीच्या किंवा यथास्थिती महापालिकेच्या विकास योजनांमध्ये अंतर्भूत करण्यासाठी प्रभाग समित्यांकडे पाठविणे. क्षेत्रसभेच्या क्षेत्रामध्ये रस्त्यावर दिवे लावण्यासाठी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे नळ, बसविण्यासाठी, सार्वजनिक स्वच्छतागृह व इतर कामे सुचविणे.विभागामध्ये पाणीपुरवठा, मलनि:सारण वाहिन्या. सार्वजनिक स्वच्छता, वादळी पावसामुळे आलेल्या पाण्याचे नियोजन, पथदिवे याविषयी समस्या सोडविणे. प्रभागातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना विशेष करून रोगप्रतिबंधक कार्यक्रमांना तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमांना साहाय्य करणे व साथीचे रोग, नैसर्गिक आपत्ती यांबाबतच्या घटनांची माहिती कळविण्याची व्यवस्था करणे.क्षेत्रसभेचे हक्क व अधिकारपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवांची आणि क्षेत्रामध्ये पार पाडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांची माहिती मिळविणे. क्षेत्रसभेने केलेल्या सूचनांवर काय कार्यवाही झाली, सभेच्या अधिकारितेच्या संबंधात प्रभाग समितीने किंवा महापालिकेने घेतलेल्या निर्णयांची माहिती मिळविणे.क्षेत्रसभेच्या अधिकारितेसंबंधातील निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीविषयी माहिती मिळविणे.स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्रदूषणास आळा घालण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे.प्रभागाच्या विकासामध्ये नागरिकांचा थेट सहभाग असावा, यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कायदा १९४९मध्ये शासनाने सुधारणा करून क्षेत्रसभेची तरतूद केली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये वर्षातून किमान दोन क्षेत्रसभा घेण्याचे बंधन असताना, नवी मुंबईमध्ये त्याची अंमलबजावणी केली जात नाही. लवकरात लवकर क्षेत्रसभा गठित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. - मंगेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता