शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, एकाला अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 21, 2023 18:41 IST

मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या मुलीसोबतची घटना

नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास १४ वर्षीय मुलीला आश्रय देण्याच्या बहाण्याने घरी नेवून अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मित्राला भेटण्यासाठी हि मुलगी घराबाहेर आली असता भावाच्या भीतीने ती नेरूळला गेली होती. त्याठिकाणी एका चायनीस सेंटर चालकाने तिला रात्रीसाठी आश्रय देतो सांगून घरी नेले होते. मात्र त्याने दरवाजा लावून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच तिने प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेतली.

तुर्भे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. सदर मुलगी शनिवारी रात्री तुर्भे रेल्वेस्थानक येथे मित्राला भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिचा भाऊ तिला शोधत त्याठिकाणी येत असल्याचे तिला मित्रांनी सांगितले. यामुळे ती कोपराला आली असता त्यातच ठिकाणी तिला उशीर झाला. तर रात्र झाल्याने घरी गेल्यास घरचे ओरडतील या भीतीने ती रिक्षाने नेरुळ गावात आली होती. त्याठिकाणी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका चायनीस सेंटरजवळ आली असता एका सुज्ञ व्यक्तीने तिला खायला देऊन तो निघून गेला. यानंतर चायनीस सेंटरवरील अनिरुद्ध मोहन्ती (३७) याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिला विश्वासात घेऊन आश्रय देतो सांगून जवळच असलेल्या त्याच्या घरी नेले. मात्र ती घरात झोपली असता तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याला प्रतिकार करत तिथून पळ काढून वाशी गाठले होते. 

दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सहायक निरीक्षक निलेश येवले, गणेश दळवी, हवालदार कांबळे, अझहर मिर्झा, गोपीचंद बेंडकुळे, सचिन पाटील आदींचे पथक केले होते. त्यांनी तांत्रिक दृष्ट्या केलेल्या तपासात ती वाशी रेल्वेस्थानक परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार रविवारी पहाटे चारच्या सुमारास तिला तिथून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती सांगताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी काही तासातच अनिरुद्ध मोहन्ती याला अटक केली. अल्पवयीन मुलीने त्याच्या तावडीतून सुटका केल्याने अनर्थ टळला. 

टॅग्स :MolestationविनयभंगNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी