शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी प्रशासनाविरोधात हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 03:57 IST

संघर्ष समितीच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित : जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल फिरकलेच नाहीत

उरण : जेएनपीटीकडून प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी भाजपा, मनसे वगळता सर्वपक्षीयांच्या वतीने हल्लाबोल करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल फिरकलेच नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी करळफाटा येथे रस्त्यावर उतरून जेएनपीटीची नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी दिली. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांच्या बैठकीनंतरच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही भोईर यांनी यावेळी सांगितले.

आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करळफाटा येथे हल्लाबोल आंदोलनाला सकाळी ११ वाजता सुरु वात करण्यात आली.या सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित आंदोलनात उरण-पनवेलमधील सुमारे तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणारे जेएनपीटीचे प्रभारी चेअरमन नीरज बन्सल यांची हकालपट्टी करावी व त्या ठिकाणी मराठी आयएएस अधिकारी नेमावा, जेएनपीटीचे खासगीकरण रद्द करा, साडेबारा टक्के भूखंडाचा त्वरित ताबा मिळावा, बीएमसीटीपीएल प्रकल्पात मेडिकल झालेल्या त्या १७ मुलींना आणि मुलाखती झालेल्या ४३५ प्रकल्पग्रस्तांना त्वरित नोकरीत सामावून घ्यावे, बीएमसीटीएलमुळे बाधित झालेल्या पाणजे गावातील मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी, डीपीडी धोरण रद्द करावे, उरण तालुका प्रकल्पग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचे नव्याने पुनर्वसन करावे, जेएनपीटीकडून देण्यात येणारा मालमत्ता कर ग्रामपंचायतींना द्यावा, १८ गावातील सगळ्या प्रकल्पग्रस्तांना मोफत शिक्षण मिळावे, परप्रांतीयांची भरती रद्द करावी, परवानगीपेक्षा जास्त कांदळवनाची कत्तल केल्याप्रकरणी बीएमसीटीपीएलवर गुन्हा दाखल करावा, जेएनपीटी सीएसआर फंड उरण तालुक्यात खर्च करावा या प्रकारच्या अनेक मागण्या या आंदोलनानिमित्त करण्यात आल्या.कडक बंदोबस्तआंदोलन सुरू असले तरी जेएनपीटी परिसरातील कंटेनर वाहतूक सुरळीत आणि निर्धोकपणे सुरू होती. तसेच जेएनपीटीसह चारही बंदरातील कामकाज सुरळीतपणे सुरु होते अशी माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ प्रंबधक जयवंत ढवळे यांनी दिली. पोलिसांनीही डीसीपी अशोक दुधे, एसीपी विठ्ठल दामगुडे, वपोनि. चेतन काकडे, निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटी