शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
3
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
4
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
5
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
6
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
7
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
8
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
9
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
10
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
11
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
12
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
13
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
14
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
15
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
16
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
17
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
19
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
20
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."

महापालिकेच्या क्रीडा सुविधांवर खेळाडूंची पसंतीची मोहर!

By योगेश पिंगळे | Published: April 18, 2024 3:38 PM

गतवर्षी ५८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त : क्रीडांगणांना वाढती मागणी

नवी मुंबई : शहरातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांचा सराव करता यावा तसेच, शहरात खेळाडू घडावेत यासाठी महापालिकेने खेळांच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालयांना अल्प प्रमाणात भाडे आकारून मैदाने, क्रीडांगणे भाड्याने दिली जातात. या सर्वच सुविधांना खेळाडूंचीदेखील मोठी मागणी असून क्रीडांच्या विविध सुविधांमधून गतवर्षात महापालिकेला सुमारे ५८ लाख २९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

शहरातील खेळाडूंना खेळण्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांतील खेळाडू शहरात घडावेत, यासाठी महापालिकेने सीबीडी येते राजीव गांधी स्टेडियम, नेरूळ येथे कै. यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण, सीबीडी व घणसोली येथे मल्टिपर्पज टर्फ, घणसोली व नेरूळ येथील स्केटिंग पार्क, फिटनेस सेंटर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून बुकिंगसाठी अनेक जण प्रतीक्षेत असतात. मागील वर्षी सीबीडी येथील राजीव गांधी स्टेडियमच्या माध्यमातून महापालिकेला १५ लाख १७ हजार २८० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

यशवंतराव चव्हाण क्रीडांगणालादेखील फुटबॉलप्रेमींनी पसंती दिली असून १४ लाख ५८ हजार ७४ रुपयांचा महसूल सीबीडी येथील मल्टिपर्पज टर्फ ६ लाख ७५ हजार ५२१ घणसोली सेंट्रल पार्क मल्टिपर्पज टर्फ १३ लाख ९२ हजार ६७८ रुपये, घणसोली स्केटिंग रिंक ४ लाख ५४ हजार ९४६ नेरूळ स्केटिंग पार्क १ लाख ४७ हजार ९० आणि सीबीडी येथील फिटनेस सेंटरच्या माध्यमातून १ लाख ८३ हजार ९०० रुपये याप्रमाणे ५८ लाख २९ हजार ४८९ रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे. २०२२ -२३ या वर्षात या क्रीडा सुविधांच्या माध्यमातून ४४ लाख ४४ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. गतवर्षी महसूलात मोठी वाढ झाली असून महापालिकेच्या क्रीडा सुविधांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

शहरात विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडू घडावेत, यासाठी महापालिकेचा क्रीडा विभाग आग्रही असून त्याअनुषंगाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शहरातील आठ मैदानांमध्ये विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली आहे. मैदानांमध्ये विविध क्रीडा सुविधा उपलब्ध झल्यास युवा खेळाडूंना सराव करता येणार असून, नवीन खेळाडू घडण्यास नक्कीच मदत होईल.-ललिता बाबर, उपआयुक्त, क्रीडा विभाग, नमुंमपा.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका