शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात

By नारायण जाधव | Updated: March 6, 2024 22:11 IST

सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला

नवी मुंबई : सिडकोने प्रस्तावित केलेला अटल सेतू ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा थेट सात किलोमीटर लांबीचा नवा सागरी मार्ग आता लवकरच साकारला जाणार आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, जे. कुमार कंपनीने बाजी जिंकली आहे. सिडकोने या सागरी रस्त्यासाठी आधी ६८१ कोटी ६३ लाख रुपये खर्च प्रस्तावित केला होता; मात्र आता परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने तो २३० कोटींनी वाढून ९१२ कोटी २८ लाखांवर गेला आहे. ३० महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे बंधन आहे.

असा असेल सागरी मार्ग१ - अटल सेतू जंक्शनपासून ते आम्र मार्ग जंक्शनपर्यंत तो बांधण्यात येणार असून, त्याची लांबी सात किमी इतकी आहे. यात मूळ रस्ता ५.८ किमी असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मार्गिका १.२ किमी आहे.२ - नवी मुुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची एक मार्गिका उलवेजवळच्या शिवाजीनगर येथे तर दुसरी मार्गिका चिर्ले जंक्शनजवळ उतरवली आहे. शिवाजीनगर मार्गिकेवरून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी सिडको हा सात किमीचा सागरी मार्ग बांधत आहे.३ - काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहतुकीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्याच्या पाम बीच रोड, आम्र मार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरील वाहतुकीचा भार कमी होऊन सुरळीत प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गावरून विमानतळाच्या दिशेने डाव्या बाजूला नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीही मार्गिका असणार आहे. यामुळे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गावरून बेलापूर, नेरुळ, सीवूड, सानपाडातील प्रवाशांनाही तो सोयीचा ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यात वृक्षांची लागवड- मार्गाच्या कामासाठी ३,७२८ खारफुटींची कत्तल करावी लागणार असून, त्यासाठी पनवेल तालुक्यातील न्हावे येथील ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन वळती केली आहे. या नुकसानीच्या बदल्यात शेवरे खुर्द, ता. पारोळा, जि. जळगाव येथे देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड सिडको करणार आहे.

वन्यप्राण्यांच्या जीवनमानावरील परिणामांचा अभ्यास- हा मार्ग फ्लेमिंगो पक्षांच्या अधिवास क्षेत्रातून जात असल्याने त्याचे बांधकाम सुरू असताना आणि पूर्ण झाल्यानंतरही किमान दोन वर्षांपर्यंत त्याच्यामुळे फ्लेमिंगो पक्षांसह समुद्री पक्षी आणि वन्यप्राण्यांच्या जीवनमानावर काय बरे-वाईट परिणाम झाले, याचे निरीक्षण मुंबई विद्यापीठाच्या झुनझुनवाला महाविद्यालयाकडून करून त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना वने आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी देताना केली आहे.

बाधित मच्छीमारांना भरपाई ?- सागरी मार्गाच्या बांधकामामुळे मच्छीमारांचा येण्या-जाण्याचा मार्ग, खाडी प्रदूषण होऊन त्यांच्यावर परिणाम व्हायला नको, याची दक्षता सिडकोस घ्यावी लागणार आहे. कदाचित, बाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई