शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रय मिळाला, तरी घरची ओढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:43 IST

सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : लॉकडाउनदरम्यान गावी जाण्यासाठी निघालेले, गरीब, गरजू, कामगारांना प्रशासनाकडून आधार दिला जात आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.दाढी-केस वाढलेले, कुणाचे लहान बाळ दुडुदुडु धावतेय तर काही महिला आपल्या सुखादु:खाच्या गुजगोष्टी करताना निवारा केंद्रात दिसत आहेत. इथे खायला-प्यायला वेळच्या वेळी मिळत आहे. आधी झोपडीत राहत होतो, इथे इमारतीत पंख्याखाली सतरंजीवर झोपतोय. तरीही गावाकडची, घरची ओढ लागल्याचे मत निवारा केंद्रातील आश्रित व्यक्त करीत आहेत.मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात गरीब, मजूर, बिगारी कामगार, आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत. यात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पैशाविना उपासमारीची वेळ आली आहे. गावी जावे तर वाहने बंद आहेत. काही प्रमाणात चालत गावी निघालो असता पोलिसांनी अटकाव करत निवारा केंद्रात राहण्यास सांगितले आहे. याकरिता पनवेल महापालिका क्षेत्रात बेघर, निराधार, मजूर, विस्थापितांसाठी तालुका क्रीडा संकूल, कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, व्ही.के. हायस्कूल, कळंबोली येथील काळभैरव मंगल कार्यालय या चार ठिकाणी महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली आहे.चारही केंद्रांत १०७ व्यक्ती वास्तव्यास आहेत. दररोज अल्पोपाहार, चहा आणि दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण महापालिकेने स्थापन केलेल्या कम्युनिटी किचनद्वारे दिले जाते. त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता करमणूक तसेच दैनंदिन घडामोडीचे बातमीपत्र पाहण्याचीही सामाजिक अंतर ठेवून व्यवस्था केली आहे.>राज्यस्थान, मध्य प्रदेश, कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, घाटमाथ्यावरील मजूर या चार केंद्रात आहेत. राहण्याची व्यवस्था चांगली आहे. नाश्ता-जेवण वेळेवर मिळते आहे. परंतु आई-वडील, मुले, घरी आहेत. घराची, कुटुंबाची आठवण येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. अनेकांच्या मोबाइलमधील रीचार्ज संपले असल्याने गावी फोन करता येत नाही आणि आपली खुशालीही कळवता येत नसल्याये दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.