शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:54 IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

पनवेल : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी  नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती . या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही . तसेच कोणतेही  सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला . या प्रकरणात तुमच्या जीवाला धोका आहे . तुम्ही सावध रहा असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले . पोलिसांकडे या प्रकरणात कुरुंदकर आरोपी असलेल्या  ऑडिओ व्हिडीओ उपलब्ध असताना देखील या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकर विरोधी गुन्हा दाखल केला नव्हता . पोलीस सहकार्य करीत नसल्याने ऑक्टॉबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यांनंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली .त्यांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर  ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले . या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७  रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय आल्यांनतर हा विषय दृष्टीक्षेपात आला . आम्ही ज्यावेळी आयुक्तांना पुराव्याचे  दाखले देत कुरुंदकर यांना अटक करण्याची मागणी केली ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले . मात्र याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपीना अटक करण्यात आली असल्याचे अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे यांनी सांगितले . या प्रकरणी आयुक्त नगराळे यांनी हे प्रकरण दडविण्याचे प्रयत्न केल्याने त्यांना प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत आनंद बिद्रे यांनी केले.          ११ एप्रिल २०१६ रोजी संध्याकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर हे सोबत होते . यांनतर रात्री ११  वाजता अभय कुरुंदकर याने राजेश पाटील ला फोन केला . तेव्हापासून आश्विनी बेपत्ता आहे होत्या  आणि त्यांचा फोन देखील तेव्हापासून बंद होता . यांनतर १४ एप्रिल रोजी केवळ एका व्हाट्अँप मेसेज पाठविण्यापुरता त्यांचा फोन चालू होता . त्यानंतर  अश्विनी बेपत्ता पुन्हा कोणालाच दिसल्या नाहीत असे आनंद बिद्रे यांनी सांगितले . अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण केवळ प्रसार माध्यमांमुळे बाहेर आले . प्रसार माध्यमांनी बातम्या दाखविल्यानांतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असे यावेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले . आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपासंदर्भात आयुक्तांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल