शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

पावसामुळे फ्लेमिंगोचे आगमन लांबणीवर, डिसेंबरमध्ये किलबिलाट वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 01:58 IST

पावसाचा कालावधी वाढल्यामुळे यावर्षी फ्लेमिंगोचे आगमण लांबणीवर पडले होते. सद्यस्थितीमध्ये पक्षांचे आगमन सुरू झाले असून डिसेंबरध्ये खाडीमध्ये हजारो फ्लेमिंगोचे आगमन होणार आहे.

नवी मुंबई : पावसाचा कालावधी वाढल्यामुळे यावर्षी फ्लेमिंगोचे आगमण लांबणीवर पडले होते. सद्यस्थितीमध्ये पक्षांचे आगमन सुरू झाले असून डिसेंबरध्ये खाडीमध्ये हजारो फ्लेमिंगोचे आगमन होणार आहे. पक्षीनिरीक्षकांसाठी वनविभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे फ्लेमिंगो पावसाळ्यानंतर भारतात यायचे. काही वर्षांपासून त्यांनी परतीचा मार्ग बंद करून भारतामध्येच वास्तव्य सुरू केले. पावसाळ्यामध्ये कच्छ परिसरामध्ये त्यांचे वास्तव्य असते. पावसाळा संपला की,मुंबई, नवी मुंबईमधील खाडीकिनारी वास्तव्यास येतात. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या सुरवातीलाच हजारो पक्षी ऐरोली, वाशी व करावे परिसरातील खाडीमध्ये व उरण परिसरात येतात. पक्षी निरीक्षकांसाठी मुंबई, उपनगर व राज्यभरातून पक्षीनिरीक्षक या परिसरामध्ये येतात. करावेमधील टी. एस. चाणक्य च्या मागील बाजूला असलेल्या खाडीमध्ये पक्षांचे थवे पहाटे व सायंकाळी पहावयास मिळायचे. या वर्षी पाऊस आॅक्टोबरपर्यंत सुरू होता. यामुळे पक्षांचे आगमन लांबवणीवर पडले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पक्षांचे आगमन सुरू झाले आहे. डिसेंबरमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे हजारो पक्षांचा किलबिलाट खाडीमध्ये सुरू राहण्याची शक्यता आहे. करावे परिसरामध्ये पक्षीप्रेमी सकाळी व सायंकाळी हजेरी लावू लागले आहेत. परंतु अद्याप पुरेशा प्रमाणात पक्षी पहावयास मिळत नसल्याने अनेकांना निराश होवू परत जावे लागत आहे.करावेमध्ये सुविधा नाहीतनवी मुंबईमध्ये ऐरोली ते वाशी दरम्यान फ्लेमिंगो अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. या परिसरामध्ये पक्षीनिरीक्षणासाठी बोटीचीही सोय आहे, परंतु करावे व एनआरआय परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात पक्षी येत असतात. या परिसरामध्ये पक्षीनिरीक्षणासाठी सुविधा असावी व समाजकंटक पक्ष्यांची शिकार करणार नाहीत यासाठीही लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत पक्षीनिरीक्षक व्यक्त करत आहेत.पक्षांच्या १६८ पेक्षा जास्त प्रजातीनवी मुंबईमध्ये फक्त फ्लेमिंगोच नाही, तर इतरही पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये १६८ पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. खाडी व किनाºयावरही विविध प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात.खाडीमध्ये फ्लेमिंगोंचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना पक्षीनिरीक्षण करता यावे, यासाठी सागरी सफरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय ऐरोलीमधील जैवविविधता केंद्रामध्येही फ्लेमिंगोसह जैवविविधतेची माहिती उपलब्ध करून दिली आहे.- एन जी कोकरे, वनक्षेत्रपाल, ठाणे खाडी फ्लेमिंगो विभाग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईwildlifeवन्यजीव