शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरमधून गॅस चोरणाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:17 IST

एजन्सीचे कामगार : भररस्त्यात प्रकार सुरू असताना कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरणाऱ्या तिघांना सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही गॅस एजन्सीचे डिलिव्हरी बॉय असून रात्रीच्या वेळी ते भररस्त्यात भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस चोरी करायचे. अशा प्रकारे त्यांनी आजवर अनेक ग्राहक व शासनाची फसवणूक केल्याची शक्यता आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी आडोशाच्या ठिकाणी गॅस एजन्सीचे टेम्पो उभे असल्याचे पाहायला मिळते. त्या ठिकाणी गॅस चोरी होत असल्याच्या तक्रारी अनेकदा नागरिकांकडून पुढे आल्या आहेत. असाच प्रकार सानपाडा येथे सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. पोलीस नाईक भाऊसाहेब होलगीर हे कामावरून घरी जात असताना सानपाडा सेक्टर ५ येथे रस्त्यालगत आडोशाच्या ठिकाणी त्यांना गॅस एजन्सीचा टेम्पो उभा असल्याचे दिसून आले. शिवाय गॅसची दुर्गंधी येत असल्याने त्यांनी टेम्पोमध्ये डोकावून पाहिले. या वेळी तिथे गॅसची चोरी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी तत्काळ वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांना कळविले असता, त्यांनी सहायक निरीक्षक  नीलेश राजपूत यांचे पथक त्या ठिकाणी पाठवले. या वेळी पोलिसांनी टेम्पोला घेराव घातला असता दोघांनी संधी साधून पळ काढला तर तिघे पोलिसांच्या हाती लागले. चौकशीत ते तिघेही गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे समोर आले. मनोज सोनाराम बिष्णोई (२१), मनोज हनुमानराम बिष्णोई (२२) व रामस्वरूप बिष्णोई (२१) अशी त्यांची नावे आहेत. तर मांगीलाल बिष्णोई व मनफूल बिष्णोई अशी पळालेल्या दोघांची नावे आहेत. 

स्फोट होण्याची होती शक्यता  nसानपाडा सेक्टर ५ येथे शाळेच्या समोरील रस्त्यावर त्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा टेम्पो थांबवला होता. त्यामधील भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस चोरत होते. nप्रत्येक सिलिंडरमधून काही प्रमाणात गॅसची चोरी करून भरलेला रिकामा सिलिंडर ते ग्राहकांना विकायचे. या प्रकारातून त्यांनी ग्राहक व शासन यांची फसवणूक केली आहे. त्यानुसार सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. nदरम्यान, त्यांच्याकडून गॅसची चोरी होत असताना त्या ठिकाणी आग लागून स्फोट झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती. यानंतरही रहिवासी भागातच त्यांच्याकडून गॅस चोरीचे प्रकार सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई