अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीवर डॉ. कैलाश जवादे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 08:40 AM2021-05-05T08:40:59+5:302021-05-05T08:41:20+5:30

Dr. Kailash Javade : डॉ. कैलाश जवादे हे सध्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रूग्णालयात शल्यचिकित्सा विभागात हिपॅटोबिलीयरी सर्जरी आणि प्रत्यारोपण शल्यचिकित्सा पथक प्रमुख(युनिट हेड) म्हणून कार्यरत आहे.

Appointment of Dr. Kailash Javade on Organ Transplant Advisory Committee | अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीवर डॉ. कैलाश जवादे यांची नियुक्ती

अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीवर डॉ. कैलाश जवादे यांची नियुक्ती

Next

नवी मुंबई : राज्य सरकारच्या मानवी अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची नुकतीच फेररचना झाली असून या समितीवर सदस्य म्हणून प्रत्यारोपण तज्ञ्ज व आरोग्य क्षेत्रात काम करणा-या ‘दोस्त’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक नवी मुंबईतील डॉ. कैलाश जवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Appointment of Dr. Kailash Javade on Organ Transplant Advisory Committee)

डॉ. कैलाश जवादे हे सध्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रूग्णालयात शल्यचिकित्सा विभागात हिपॅटोबिलीयरी सर्जरी आणि प्रत्यारोपण शल्यचिकित्सा पथक प्रमुख(युनिट हेड) म्हणून कार्यरत आहे.  वैद्यकीय क्षेत्रात दोन दशके कामाचा त्यांना अनुभव असून प्रत्यारोपण तज्ञ्ज म्हणूनही त्यांना ओळखले जाते. 

३० एप्रिल २०२१ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची  फेररचना करण्यात आली आहे. या समितीत राज्यभरातील प्रत्यारोपणाशी निगडीत १४ तज्ञ्ज सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच संचालक,आरोग्य सेवा यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. जवादे यांनी एम.बी.बी.एस., एम.एस. यानंतर अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण हे कोरिया व तैवान या देशातून घेतले आहे. आशिया खंडातील  पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण करणारे डॉ. चाऊलांग चेन यांच्या मागर्दर्शनाखाली त्यांनी यकृत प्रत्यारोपणाचे धडे गिरवले आहेत. त्यांनी आजवर दिल्लीतील अपोलो रूग्णालयातील, चेन्नईतील चेट्टीनाड रूग्णालय तसेच मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयात काम केले आहे. प्रत्यारोपण क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी केलेल्या कामांचे तसेच संशोधन अहवाल सादरीकरण केले आहे.

सध्याची  केवळ मुंबईतील आकडेवारी लक्षात घेतली तर  पाच हजार रूग्ण मूत्रपिंड (किडनी), ४०० रूग्ण यकृत(लिव्हर) व २०० रूग्ण हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत. आपल्या देशातील रूग्णांची अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे. त्यामुळेच आपल्या देशात अवयदानाबद्दल जाणीव जागृती करून त्याला रक्तदानासारख्या लोक-चळवळीचे रूप देणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन डॉ. जवादे हे ‘दोस्त’ (Dhanwatari’s Organisation for Socio-health Transformation)  या संघटनेच्या माध्यमातून गेली १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. 

गेले काही वर्षे  ते नियमित देहू ते पंढरपूर असे पंढरीच्या वारीत जाऊन हजारो वारक-यांची आरोग्य सेवा करीत आहेत. तसेच पथनाट्ये, चित्रप्रदर्शनी,,माहितीपत्रकांचे वाटप चर्चा व प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमातून अवयवदानाबद्दल प्रबोधन करीत आहेत. यासोबतच विविध ठिकाणी जाऊन त्यांनी जाणीवजागृतीपर कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या संवादानंतर प्रेरित होऊन अनेकांनी अवयवदान दान संकल्प पत्र भरूनही दिले आहे.  याशिवाय पालघर जिल्ह्यात शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत  डहाणू, कासा, पालघर, जव्हार आणि मनोर या ठिकाणी शल्यचिकित्सा शिबिरांमध्ये सहभाग घेऊन हजारावर शस्त्रक्रिया केल्या आहेत.

अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम व्हावे हे त्यांचे ध्येय असून विविध देशांमधील अशा कामांचा त्यांनी सखोल अभ्यासही केला आहे. या क्षेत्रात विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉ. डी.वाय. पाटील रूग्णालयात त्यांनी शल्यचिकित्सा क्षेत्रातील हिपॅटोबिलीअरी फेलोशिप सुरू केली आहे. या फेलोशिप अंतर्गत तरूण शल्यचिकित्सकांना (सर्जन) भारतासोबतच तैवानमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठा अंतर्गत कार्यरत अलाईड हेल्थ सायन्सेस या विभागात ते क्लिनिकल हेड म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत.

Web Title: Appointment of Dr. Kailash Javade on Organ Transplant Advisory Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.