शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेत फेरीवाल्यांवर केला कारवाईचा दिखाऊपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:50 IST

पालिकेची धूळफेक; कमिटीच्या आगमनापूर्वी रस्ते स्वच्छ, नंतर जैसे थे

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या वाढत चालली आहे. त्यावर केवळ स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या कालावधीतच कारवाया होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तात्पुरती स्वच्छता करून पुरस्कार पटकावण्याचा डाव पालिका अधिकारी रचत असल्याचे उघड होत आहे.महापालिकेला नुकताच स्वच्छता सर्वेक्षणात देशात तिसरा व राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशातच पुन्हा एकदा शहर स्वच्छता सर्वेक्षणासाठी पालिका सज्ज झाली आहे. त्याकरिता विभागनिहाय पाहणी सुरू आहे. मात्र, या पाहणी कमिटीच्या आगमनापूर्वी रस्ते व परिसर स्वच्छ केले जात असून, त्यांनी पाठ फिरवताच परिस्थिती तशीच पाहायला मिळत आहे. पालिकेची फेरीवाल्यांवर होणारी कारवाई दिखाऊ असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ दरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमण वाढतच चालले आहे. प्रत्येक विभागात राखीव भाजीपाला मार्केटच्या बाहेरचे रस्ते फेरीवाल्यांची बळकावले आहेत. सातत्याने तक्रार होऊनही तिथले रस्ते मोकळे होऊ शकलेले नाहीत. मात्र, मंगळवारी या विभागाचा पाहणी दौरा होणार असल्याने संपूर्ण रस्ता फेरीवाला मुक्त करून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे काही तासासाठी का होईना, रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिथे बाजार बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून केवळ पाहणी कमिटीच्या स्वागतासाठी शहर स्वच्छ होत असल्याचे उघड होत आहे, परंतु केवळ पुरस्कार पटकावण्याची दिखाव्यासाठी तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी शहर फेरीवाला मुक्त करून स्वच्छ करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.शहराबाहेरच्यांना मिळतोय राजकीय वरदहस्त कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, नेरुळ विभागात अनधिकृत फेरीवाले मोठी समस्या बनले आहेत. बहुतांश फेरीवाले शहराबाहेरचे असून, त्यांना काही अधिकाऱ्यांसह राजकीय वरदहस्त लाभत आहे. यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण शिजत आहे. त्याच उद्देशाने फेरीवाल्यांकडे कारवाईकडे कानाडोळा होत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यात सिडको व पालिका अधिकारीही संगनमताने उद्देश साध्य करून घेत असल्याचा आरोप होत आहे.