शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

नवी मुंबईची जुनी छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 01:52 IST

आगामी वर्ष हे सिडकोचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

नवी मुंबई : आगामी वर्ष हे सिडकोचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त सिडकोतर्फे दिनदर्शिका, कॉफी टेबल बुक, माहितीपुस्तिका यांचे प्रकाशन तसेच नवी मुंबईच्या जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन आदी विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील जुने रहिवासी, विविध संस्था, पत्रकार, छायाचित्रकार यांनी त्यांच्या संग्रही असलेली नवी मुंबई जुनी छायाचित्रे सिडकोला पाठविण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबई विकसित करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने १७ मार्च १९७० रोजी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोची स्थापना करण्यात आली. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ठाणे, पनवेल व उरण तालुक्यांतील ९५ गावांतील ३४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळाची जमीन संपादित करून नवी मुंबईची उभारणी करण्यात आली. नवीन शहर हे सर्व प्रकारच्या पायाभूत नागरी सामाजिक आणि सांस्कृतिक सुविधांनी परिपूर्ण असेल, या दृष्टीने सिडकोने नवी मुंबईचे नियोजन केले. आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत सिडकोने नगर विकास क्षेत्रात आदर्श ठरतील, असे अनेक प्रकल्प राबविले. तर वर्तमानात सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभावीत क्षेत्र (नैना), मेट्रो, नेरुळ-उरण उपनगरी रेल्वे, कॉर्पोरेट पार्क यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.सिडकोच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईच्या विकासातील विविध टप्पे दर्शविणाऱ्या जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा सिडकोचा मानस आहे. याकरिता मागच्या ५० वर्षांतील सिडकोचे परिवहन, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा किंवा अन्य प्रकल्प, नवी मुंबईतील बस अथवा रेल्वे स्थानके, नवी मुंबई विकसित होण्यापूर्वीच्या काळातील या परिसरातील गावे, यांच्याशी संबंधित जुनी छायाचित्रे सिडकोच्या सीबीडी येथील जनसंपर्क कार्यालयात २५ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.