शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत हापूसला मिळतेय ‘गोड’ वागणूक; आंबा व्यवस्थापनासाठी यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 08:22 IST

वाहतूककोंडी टाळण्यासाठी तयार केली नियमावली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये चार महिने आंब्याचे वर्चस्व असते. हंगाम काळात वाहतूककोंडी टाळण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या योग्य नियोजनासाठी व्यापारी संघटना व प्रशासनाने विशेष नियमावली तयार केली आहे. आंब्याची आवक विनाअडथळा होण्यासाठी स्वतंत्र गेट निश्चित करून कलिंगड, टरबूजसारख्या फळांना दुपारी तीननंतर मार्केट प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये वर्षभर रोज २५० ते ३०० वाहनांची आवक होत असते. परंतु आंबा हंगामात रोजची आवक ६०० ते ७०० वाहनांवर पोहोचते. सद्य:स्थितीमध्ये प्रतिदिन ५०० पेक्षा जास्त वाहनांची आवक सुरू आहे. १५ मार्चनंतर आंब्याची आवक प्रचंड वाढण्याचा अंदाज आहे. 

व्यापाऱ्यांना संघटनेचे आवाहन 

हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. बाजार समिती प्रशासनानेही आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. आंब्याच्या सर्व वाहनांना गेट क्रमांक ३ मधून मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, तर माल घेऊन येणाऱ्या फळांची गाडी चार तासांपेक्षा जास्त काळ मार्केटमध्ये उभी राहणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. व्यापाऱ्यांची खासगी वाहने गेट क्रमांक पाचमधून आत येण्याची व्यवस्था केली आहे. 

दहा दिवसांत दोन लाख दंड

आंबा हंगामासाठी नियमावली निश्चित केल्यानंतर वाहनांमध्ये व मोकळ्या पॅसेजमध्ये व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. दहा दिवसांमध्ये दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘या’ वेळात आणा कलिंगड, टरबूज 

कलिंगड, टरबूजचे ट्रक दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीमध्ये मार्केटमध्ये आणण्याच्या सूचना आहेत. वाहतूककोंडीचे नियोजन करण्यासाठी जादा सुरक्षारक्षकही तैनात केले जाणार आहेत. वाहनांमध्ये व्यापार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 

आंबा हंगामामध्ये वाहनांची संख्या वाढते. या कालावधीमध्ये व्यापार सुरळीत व्हावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. नियमांचे पालन  करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. - संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट 

 

टॅग्स :Mangoआंबा