शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

एपीएमसीत माथाडी, व्यापाऱ्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:48 PM

फटाक्यांची आतषबाजी : आंदोलनातून घडविले एकीचे दर्शन; मार्केटमधील व्यवहार होणार सुरळीत

नवी मुंबई : बाजार समितीच्या अस्तित्वासाठी सुरू केलेल्या लढाईमध्ये दुसºयाच दिवशी यश मिळाल्यामुळे माथाडी कामगार, व्यापारी व सर्व घटकांनी फटाके फोडून जल्लोष केला. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच आस्थापनेवरील कर्मचाºयांसह सर्व आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला असून मध्यरात्रीपासून बाजार समितीमधील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आंदोलन हे समीकरण झाले आहे. मुंबईमधून बाजारपेठा नवी मुंबईत स्थलांतर करण्यापासून नियमित कोणत्या ना कोणत्या प्रश्नांसाठी कधी व्यापारी, कामगार, वाहतूकदार आस्थापनेवरील कर्मचारी आंदोलन करत असतात. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांसाठी माथाडी कामगारांसह व्यापाºयांनी एकत्र लढे दिले आहेत. परंतु या सर्वांच्या आंदोलनामध्ये आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी सहसा सहभागी होत नव्हते. शासनाने २५ सप्टेंबरला काढलेला अध्यादेश व २७ नोव्हेंबरला मंजूर केलेल्या विधेयकाच्या विरोधात प्रथमच आस्थापनेवरील कर्मचारीही उघडपणे आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे दोनही दिवस पाचही मार्केटमधील १०० टक्के कामकाज बंद होते. शासनाने अध्यादेश मागे घेतल्यानंतर धान्य मार्केटमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये १० हजारपेक्षा जास्त उपस्थिती होती. व्यापारी प्रतिनिधी अशोक बढीया यांनी सर्वांनी संघटितपणे लढा दिल्यामुळे यश मिळाले असल्याचे स्पष्ट केले. पाचही मार्केटमधील सर्व घटकांनी एकीचे दर्शन घडविल्यामुळे त्याची दखल शासनाला घ्यावी लागली. यापुढेही सर्वांनी एकी कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

पणनमंत्री सुभाष देशमुख यांनीही विधेयक मागे घेतले असून भविष्यात सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. परंतु बाजार समितीमध्येही शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हमीभाव न देणाºयांवर बाजार समितीने कारवाई केली पाहिजे. मुंबई बाजार समिती जागतिक दर्जाचे मार्केट बनविण्यासाठी नवीन सुधारणांना मदत करावी, असे आवाहनही केले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. नरेंद्र पाटील यांनीही मध्यरात्रीपासून भाजी व फळ मार्केटचे व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले.रुग्णालय उभारण्याचा प्रस्तावमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, कामगार, वाहतूकदार, शेतकरी व इतर घटक कार्यरत असतात. या सर्वांसाठी याठिकाणी सुसज्ज रुग्णालय झाले पाहिजे. बाजार समितीने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.दुष्काळग्रस्तांनामदत करावीराज्यात दुष्काळाची स्थिती आहे. जनावरांना चाºयाची टंचाई भासणार आहे. शेतकरी अडचणीत आहेत. अशा स्थितीमध्ये बाजार समितीमधील घटकांनीही मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन पणन मंत्र्यांनी केले. दुष्काळाशी लढण्यासाठी सर्वांचे योगदान हवे असल्याचे स्पष्ट केले.बाजार समितीसह किरकोळ मार्केटमध्येही शुकशुकाटबंदच्या दुसºया दिवशी बाजार समितीमधील धान्य, मसाला, कांदा, भाजी व फळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. २ दिवसामध्ये ५० कोटींची उलाढाल थांबली आहे. सोमवारी कमी झालेली आवक व पुढील दोन दिवसाच्या बंदमुळे किरकोळ मार्केटमधील विक्रेत्यांकडे विकण्यासाठी मालच नव्हता. अनेकांनी दुकाने बंद ठेवली होती.सर्वांची उपस्थितीशासनाने विधेयक मागे घेतल्यानंतर धान्य मार्केटमधील सभेला सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, शरद मारू, मोहन गुरनानी, कीर्ती राणा, चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, संजय पानसरे, बाळासाहेब बेंडे, महेश मुंढे, अशोक बढीया, बाजार समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ, कर्मचारी सेनेचे सुनील थोरात, नारायण महाजन बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती