शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

मेगागृह प्रकल्पात घर रद्द झालेल्यांना सिडकोकडून आणखी एक संधी, महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:50 IST

CIDCO Home News : सिडकोच्या मेगागृह प्रकल्पात यशस्वी ठरलेल्या, परंतु आतापर्यंत घराचा एकही हप्ता न भरलेल्या अर्जदारांना सिडकोने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृह प्रकल्पात यशस्वी ठरलेल्या, परंतु आतापर्यंत घराचा एकही हप्ता न भरलेल्या अर्जदारांना सिडकोने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. संबंधित अर्जदारांनी हप्ते भरण्याची तयारी दर्शविल्यास त्यांचे रद्द झालेले घर पुन्हा मिळणार आहे. या संदर्भात सिडकोने संबंधित अर्जदारांना मेसेज पाठविला असून, ६ नोव्हेंबरपर्यंत याबाबत आपला होकार किंवा नकार कळविण्याचे आवाहन केले आहे. सिडकोच्या या निर्णयाचा जवळपास १,७00 अर्जदारांना फायदा होणार आहे. सिडकोच्या माध्यमातून २0१८ मध्ये पंधरा हजार घरांची योजना जाहीर करून सोडत काढण्यात आली होती. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर अर्जदारांच्या अडचणीत लक्षात घेऊन सिडकोने सदनिकांचे हप्ते भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ दिली. तथापि, काही अर्जदारांनी आतापर्यंत सदनिकेचा एकही हप्ता भरला नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले. त्यामुळे सदर अर्जदार हे हप्ता भरण्यास व सदनिका घेण्यास इच्छुक नाहीत, असे गृहीत धरून त्यांच्या सदनिका पुढील संगणकीय सोडतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. त्यानुसार, २९ सप्टेंबर रोजी नियोजित एकही हप्ता न भरलेल्या जवळपास १,७00 सदनिकांचे वाटपपत्र सिडकोने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. सिडकोच्या या निर्णयाला विविध स्तरातून विरोध झाला.लाभार्थी अर्जदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १९ ऑक्टोबर रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांची भेट घेऊन घरे रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार, सिडकोने नियोजित एकही हप्ता न भरलेल्या सोडतधारकांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.दरम्यान, मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सिडकोच्या निर्णयाचे स्वागत केले. 

...तर पुढील योजनेत समावेशघरे रद्द करण्यात आलेल्या सोडतधारकांनी ६ नोव्हेंबरपर्यंत हप्ते भरण्यास इच्छुक आहोत की नाही, हे कळविणे आवश्यक आहे. जे अर्जदार प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्या घरांचे वाटप रद्द करून त्यांचा पुढील संगणकीय सोडतीमध्ये समावेश केला जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :HomeघरcidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई