शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 01:09 IST

मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मानधन वाढविण्याची मागणी

बोर्ली-मांडला: एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी महिला कर्मचारी काम करीत असून गेल्या दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असून तातडीने मानधन देण्यात यावे. याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी महिला कर्मचारी काम करीत आहेत. अंगणवाडीत काम करणाऱ्या या महिलांना ग्रामीण, आदिवासी विभागात व शहरी क्षेत्रातील गरीब कुटुंबापैकी आहेत. राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या मानधनाची रक्कम न दिल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत असून त्यांना तातडीने मानधन देण्यात येऊन होणारी उपासमार थांबवावी, अशी मागणी करण्यात आली असून सदर निवेदनाच्या प्रती राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना माहिती व कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सुमारे ५३३ प्रकल्पात २ लक्ष अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. ५३३ पैकी सुमारे ४२५ प्रकल्प हे ग्रामीण व आदिवासी विभागात कार्यरत आहेत. या प्रकल्पात गरीब, विधवा, परित्यक्ता अंगणवाडी महिला काम करत आहेत. मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जगणं मुश्कील झाले आहे.अशाही परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर घर चालवणं अवघड होत आहे.कुपोषण संपवणारी अंगणवाडी कर्मचारी आज मानधन न मिळाल्यामुळे कुपोषित झाले आहे.    - जिविता पाटील, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे, अलिबाग रायगड प्रतिनिधी

टॅग्स :Raigadरायगड