शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांसाठी पालिका शाळांचा पर्याय, इंग्रजीसाठी पैसाच हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 10:06 IST

School : नवी मुंबईमधील मूळ गावांमध्ये सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाची सुरूवात झाली. शिरवणे व इतर गावांमध्ये  जमिनीचाच पाटीप्रमाणे वापर करून मुलांना शिक्षण देण्यास सुरूवात झाली.

नवी मुंबई : धुळापाटीपासून नवी मुंबईमधील शैक्षणिक क्षेत्राच्या वाटचालीची सुरूवात झाली. सद्यस्थितीमध्ये देशातील प्रमुख एज्युकेशन हब म्हणून शहराची ओळख निर्माण झाली आहे.  सद्यस्थितीमध्ये सर्वसामान्य गरीब घरातील मुलांना मोफत शिक्षणासाठी महानगरपालिकेचाच पर्याय शिल्लक असून, इंग्रजी व उच्च शिक्षणासाठी मात्र पैसा मोजावा लागत आहे. 

 नवी मुंबईमधील मूळ गावांमध्ये सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाची सुरूवात झाली. शिरवणे व इतर गावांमध्ये  जमिनीचाच पाटीप्रमाणे वापर करून मुलांना शिक्षण देण्यास सुरूवात झाली. धुळापाटीची शाळा म्हणून तेव्हाच्या शाळा ओळखल्या जात होत्या. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. सिडकोची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक नोडमध्ये शिक्षण संस्थांसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आले व शहराची ओळख ‘एज्युकेशन हब’ अशी झाली. 

    नवी मुंबईचे नियोजन करताना ‘नोड तिथे शाळा’ असे धोरण निश्चित केले आहे. शिक्षण संस्थेसाठी भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.     महानगरपालिका व खासगी शिक्षण संस्थांना हे भूखंड नियमाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

विविध बोर्डांच्या शाळा वाढल्यानवी मुंबईमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या  वाढली आहे. आता विविध बोर्डांच्या शाळांना पसंती दिली जात आहे. राज्य बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई शाळांना पसंती दिली जात आहे. 

१८ वैद्यकीय महाविद्यालयेराज्यातील सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये असणाऱ्या शहरांमध्ये  नवी मुंबई, पनवेलचाही समावेश होतो. विविध वैद्यकीय शाखांचे शिक्षण देणारी १८ महाविद्यालये याठिकाणी असून,  त्यामध्ये १२,७९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

३१ अभियांत्रिकी महाविद्यालयेनवी मुंबई, पनवेल परिसरात जवळपास ३१ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यामध्ये ४६,८५० विद्यार्थी शिक्षण घेत असून, देशभरातील विद्यार्थी अभियांत्रिकीचे  शिक्षण घेण्यासाठी येथे प्रवेश घेत आहेत. 

पैसा असेल त्यालाच आधुनिक शिक्षण : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील फी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांची फी २५ हजारपासून सव्वा लाख  रुपयांवर गेली असून, त्या शाळांमधील फी सामान्यांना परवडत नाही.

टॅग्स :Schoolशाळा